डॉ.भाई केशवराव धोंडगे अनंतात विलीन.. साश्रु नयनांनी शासकीय इतमामात शेवटचा निरोप , कंधार तालुक्यावर शोककळा..

फुलवळ ; प्रतिनिधी

शेकाप शी एकनिष्ठ असणारे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार व खासदार डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्यावर ता. २ जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी शासकीय इतमामात चाहत्यांनी साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.

शेकापचे जेष्ठ नेते, संसदपटू, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, सलग ३० वर्ष विधिमंडळ गाजवून सोडणारे डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी ता. १ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते.

 

ता. २ जानेवारी रोजी श्री शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड येथे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजे पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी तीन वाजता श्री शिवाजी हायस्कुल येथून महाराणा प्रतापसिंह चौक, श्री शिवाजी चौक, गांधी चौक, विधी महाविद्यालय मार्गे बहाद्दरपुरा अशी अंत्ययात्रा कडून क्रांतिभुवन या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री किन्हाळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नर्सिंगराव पवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार विक्रम काळे, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार भाई गुरुनाथ कुरुडे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भाजप नेते एकनाथ पवार, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर,

उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, उपविभागीय अधिकारी डॉ. मंडलीक, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, माजी नगराध्यक्षा शोभाताई नळगे, माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, माजी शिक्षण सभापती संजय कऱ्हाळे, संजय बेळगे, राष्ट्रवादीचे वसंत सुगावे, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, बंजारा क्रांतिदलाचे देविदास राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अड. विजय धोंडगे, माजी उपनगराध्यक्ष महोमद जफरोद्दीन, कंधार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार, रंगनाथ भुजबळ, शिवसेनेचे बाळू पाटील कऱ्हाळे, कुलगुरू भोसले, भाजपचे संतुकराव हंबर्डे, नानासाहेब जाधव, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, प्रतिभाताई चिखलीकर, जि.प.सदस्या प्रणिता देवरे-चिखलीकर, भाऊसाहेब कदम, जेष्ठ विधिज्ञ अड. बी. के. पांचाळ, संभाजी पाटील केंद्रे, बी. आर.कदम, आमदार राम पाटील रातोळीकर, किनवटचे आमदार भीमराव केराम, भाजप नेते पाशा पटेल, काँग्रेसचे संजय भोसीकर, गोविंदराव नागेलीकर, शेकापचे विक्रम शिंदे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

 

 

 

भाई केशवराव धोंडगे यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी तर अलोट गर्दी केलीच होती परंतु नित्यनेमाने सोमवार हा कंधार चा आठवडी बाजार असतांनाही सर्वच व्यापार्यांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. तसेच क्रांतिभुवन बहद्दरपुरा नगरीतही सर्वत्र शोककळा पसरली होती.

 

 

अंत्यसंस्कार च्या यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडून तीन फायरिंग करून मानवंदना देण्यात आली. तर उपस्थित मान्यवरांनी शोकसंदेशात आपापल्या भावना व्यक्त केल्या , तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे वाचन ही करण्यात आले.

 

 

 

अंत्यसंस्कार साठी कंधार , लोहा तालुक्यासह परिसरातील अनेक ठिकाणाहून धोंडगे परिवारावर प्रेम करणारे व भाई केशवराव धोंडगे यांचे चाहते अंत्यसंस्कार ला मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *