सावित्रीबाई फुले यांची जयंती रविंद्रनाथ टागोर शाळेत साजरी करण्यात आली यावेळी पंचायत समिती सदस्य जनार्धन तिडके यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवानराव राठोड, भाजपाचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगवानराव राठोड म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करत स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले यांनी रचला आज त्याचाच परिणाम म्हणून शाळेत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मोठी स्वप्न पहा… आणी ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा, आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपला ठसा उमटवला आहे , येथील सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असुन भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवून आपल्या भागाचे नाव लौकिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी सहशिक्षक आर एच सुर्यवंशी हनुमंते व्ही डी, होंडाळे आर आर, तिडके ई पी, श्रीमती शेख वाय आय यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माळाकोळी येथील पंचायत समिती सदस्य जनार्धन तिडके यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गरजु विद्यार्थ्यांना गणवेश, बॅग व शैक्षणिक साहित्य दिले होते या साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन एकनाथ तिडके यांनी तर आभारप्रदर्शन विश्वदिप हनुमंते यांनी केले.