तणनाशक औषधी फवारून केले १ लक्ष रुपये टरबूज पिकाचे नुकसान; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. कंधार तालुक्यातील नागलगाव येथील घटना

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

तालुक्यातील नागलगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने ६० गुंठे क्षेत्रातील टरबूज पिकावर तणनाशक औषधी फवारणी करून जवळपास १ लक्ष रुपयाचे नुकसान करून फळधारणेत असलेल्या टरबूज पिकावर पाणी फिरवले असल्याच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

रमेश मनोहर केंद्रे वय ३३ वर्ष धंदा शेती रा.नागलगाव या सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकऱ्याने नागलगाव शिवारात काबाड-कष्ट करत आधुनिकरित्या जैविक पद्धतीने ६० गुंठ्यामध्ये टरबूज पिकाची लागवड करून मशागत ही योग्य पद्धतीने केली होती. पीकही जोमात येऊन फळधारणा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्या फळ धारणीकडे पाहत शेतकरीही आनंदित होऊन आर्थिक स्वप्न पाहत होता.

 

परंतु सूडबुद्धीने अज्ञात व्यक्तीने दि.३ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान फळ धारणेतील पिकावर तणनाशक औषधी फवारणी केल्यामुळे टरबूज पीक हे करपून जाऊन जवळपास १ लक्ष रुपयाचे नुकसान केले आहे. रमेश केंद्रे रा.नागलगाव या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४२७ भादवी प्रमाणे पुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामा पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. प्रकाश टाकरस हे करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *