ग्रामीण विकासासाठी पत्रकारांची भूमिका दिशादर्शक ठरते. असे आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने फुलवळ येथे आयोजित केलेल्या पत्रकारांचा यथोचित सत्कार समारंभात सकाळचे बातमीदार धोंडिबा बोरगावे यांनी मत व्यक्त केले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वय अभावे ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण,पशुधन संवर्धन, सामाजिक न्यायविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबासाठी ग्रामविकास मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध योजना ज्यात घरकुल योजना, सुलभ स्वच्छालय व समाज मंदिरासाठी पथदिवे आदी योजना राबविण्याकरिता ग्रामीण पत्रकारांचीही भूमिका हि शासन दरबारी महत्वाची ठरते असे मत पत्रकार व गावकरी यांना संबोधित मार्गदर्शन करताना धोंडीबा बोरगावे यांनी व्यक्त केले.
फुलवळ ग्रा.पं.तीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य बालाजी देवकांबळे यांच्या स्तुत्य अशा पत्रकारांचा सत्कार गेली ६ वर्षांपासून नियमितपने लेखणी, शाल-श्रीफळ आणि मिठाई देऊन करतात तोच उपक्रम याही वर्षी दर्पण दिनानिमित्त त्यांनी राबवला . आणि असे करणारा हा असा अवलिया तालुक्यात तो एकमेव आहे हे विशिष्ट.!
पुढे देवकांबळे बोलताना म्हणाले कि,पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार व ग्रामीणभागातील विविध समस्याकडे विशेष लक्ष देऊन गावाच्या विकासासाठी प्रशासनास सज्ज करण्याची भूमिका मांडावी असे हि बालाजी देवकांबळे यांनी आशा व्यक्त करून दाखविल्या.
यावेळी पत्रकार हाजी अन्सारोद्दीन, मिर्झा जमीर बेग, विपुल बोमनाळीकर, प्रा.मुरलीधर थोटे, प्रा.सुभाष वाघमारे,महंमद सिकंदर,एस.पी केंद्रे,सय्यद हबीब, विश्वांभर बसवंते , परमेश्वर डांगे , उमर शेख , शादूल शेख , दत्ता डांगे आदी सह कंधार, फुलवळचे विविध दैनिकांच्या पत्रकारांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वंभर बसवंते यांनी केले तर सामाजिक कार्यकर्ते आनंदा पवार यांनी आभार मानले.