आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, विद्येची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन……. स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक दिन दलितासह सर्व भारतीय समाजाच्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील लक्ष्मीबाई खंडोजी नेवासे पाटील दांपत्यांच्या पोटी झाला. अवघ्या नऊ वर्षाच्या असताना तेरा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. सावित्रीबाई ह्या सुशिक्षित नव्हत्या. सावित्रीबाई ज्योतिरावांकडून हळूहळू शिकू लागल्या. त्या स्वतः सुशिक्षित झाल्याच पण अखंड भारतातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा शिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या. स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी स्वतःपासून केली समाजातील लोकांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
ज्या काळात स्त्रीचे चूल आणि मूल एवढेच विश्व होते त्या काळात जात, धर्म, लिंगावर आधारित समाज व्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्री शिक्षणाचा क्रांतिकारी पाया रचला. 1 जानेवारी 18 48 मध्ये मध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. काही काळ जाताच फुले दांपत्यावर गृहत्यागाचा प्रसंग आला . सनातनी लोकांच्या दृष्टीने स्वतःच्या पत्नीला शिकविणे व नंतर दोघांनी मिळून शूद्र ती शुद्रांना शिकविणे म्हणजे धर्माच्या विरोधात जाणे होय याचा त्रास सावित्रीबाईंना सहन करावा लागला. सावित्रीबाई शाळेत शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या तत्कालीन समाजात स्त्रीने शिकणे हे पाप होते. त्याच समाजातील स्त्रियांना एक स्त्रीने शिकवणे हे महापाप समजले जाई. स्त्रियांना शिक्षण देण्याची पतीची जिद्द पाहून शाळेत स्वतः शिकवायला जात. सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाताना पाहून कर्मठ वादी पुणे पेटून उठले. सनातनांनी छळायला सुरुवात केली. कुचेष्टेने बोलणे, बोट दाखविणे, अंगावर चिखल फेकणे, शेण फेकणे एवढेच नव्हे तर अंगावर थुंकण्याचेही धाडस झाले . प्रसंगी दगड, गोटे हातात घेऊन सर्व शक्तीनिशी सावित्रीबाईच्या अडचणी निर्माण करण्याचे प्रयोग झाले. तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. आपल्या निंदकांना म्हणत, मी माझे कर्तव्य करीत आहे परमेश्वराने तुम्हाला क्षमा करावी.
ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांना त्या म्हणत, माझ्या लहान थोर बंधुंनो, मी आपल्या धाकट्या भगिनींना शिक्षण शिकविण्याचे पवित्र कार्य करीत आहे, मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर हे शेण अगर खडेफेकीत नसून ही फुले उधळीत आहात. तुमची कृत्य मला असे शिकवते की, मी नेहमी अशीच भगिनींची सेवा करीत रहावे. ईश्वर तुम्हाला सुखी करावे. फुले दांपत्यासअनेक अडचणी कर्मठ लोकांनी आणल्या परंतु याचा परिणाम कर्मठ लोकांवर न होता उलट त्रास देऊनही सावित्रीबाई शिकविणे थांबवत नाहीत म्हणून सनातनांनी फुले दांपत्याची तक्रार सरळ गोविंद रावांकडे केली मुलगा व सावित्रीबाई धर्मविरोधी कृत्य करत आहेत त्यांना आवरा, नाहीतर तुमच्या बेचाळीस पिढ्या नरकात पडतील, आम्हा ब्राह्मणांचे शाप घेऊ नका, तुमच्या मुलाने तुमचं नाव बुडवलं असे गोविंद रावांना सांगितले. गोविंदरावांनी सावित्री व ज्योती रावांना शिकवण्याचे कार्य बंद करण्यास फर्माविले नसता घर सोडून जाण्याचा आदेश दांपत्यांनी गृह त्याग मान्य केला परंतु सुरू केलेली शाळा बंद करणे फुले दांपत्यास शक्य नव्हते हाताने जसा सूर्य झाकता येत नाही तसे त्यांचे कार्य थांबविता आले नाही सूर्य तेजाप्रमाणे त्यांचे कार्य तेजोमय होऊ लागले.
स्त्रियांसोबत होणाऱ्या क्रूर प्रथांना सावित्रीबाईंनी विरोध केला. बालविवाह, बाल जरठ विवाह, सती केशवपन अशा कित्येक रुढीच्या नावाखाली स्त्रियावर अत्याचार होत. विधवा पुनर्विवाह मान्य नव्हते, आंतरजातीय विवाह मान्य नव्हते. सावित्रीबाईंनी अत्याचारी प्रथेच्या विरोधात उभे राहून स्त्रियांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले. स्त्री शुद्रा ती शुद्रांच्या सामाजिक व शैक्षणिक हक्कासाठी प्रत्येक घरात सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली. त्यांनी दलितांच्या जीवनातील अंधार शिक्षण रुपी पणतीने नष्ट करून त्यांच्यामध्ये तेज निर्माण केले.
फुले दाम्पत्यांनी सर्वप्रथम मनुष्य धर्म सांगितला. अस्पृश्यांना साधे पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नव्हते. समाज बांधव फक्त घोटभर पाण्यासाठी भटकत आहेत हे शल्य त्यांना मनात बोचत होते. यावर उपाय म्हणून सावित्रीबाईंनी स्वतःच्या मालकीची विहीर सन 1868 ला सर्वांसाठी खुली केली. कुणीही अस्पृश्य, बालक, वयोवृद्ध व बंधू भगिनींनी कुठलेही संकोच न बाळगता पाणी भरून न्यावे अशी दवंडी दिली आणि विहिरीजवळ तशी पाटीही लावली. स्वतःच्या वाड्यातील विहीर व हौद अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी खुले केले. सत्यशोधक समाजातून ते कार्य करू लागले समाज व्यवस्थेच्या मजबूत भिंतीत गुदमरत असलेल्या स्त्रीला मोकळा श्वास घेता यावा यासाठी 21 व्या वर्षी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. सत्यशोधक समाजातून ते कार्य करू लागले.
काव्य फुले व बावनकाशी सुबोधरत्नाकर ही सावित्रीबाईंची दोन काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या कवितेतून सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक उन्नती, गरीब व स्त्री शुद्रांचे दुःख स्पष्ट होते. पुण्यात इसवी सन 1897 च्या आरंभी प्लेग या महाभयंकर साथीच्या रोगाने थैमान घातले. घरोघरी प्लेगची लागण सुरू झाली. सावित्रीबाई रोगांना हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी रात्रंदिवस कार्य केल्या. दलित वस्तीत राहणाऱ्या एका मुलाला प्लेगची लागण झाली. सावित्रीबाई बालकास स्वतःच्या पाठीवर हॉस्पिटलमध्ये आणले. वाटेतच प्लेगणे त्यांच्यावरही झडप घातली. १० मार्च 1897 रोजी सावित्रीबाईचा देह पंचतत्त्वात विलीन झाला. धगधगत्या क्रांतिकारक ज्योतीची समाप्ती झाली. सावित्रीबाई यांना शतशः नमन…….
// कविता // पंखातील बळ क्रांतीज्योती सावित्रीबाई
बळ दिले हो पंखात झेप घेण्या हो गगनात… तू शिकविलेस आम्हा या जगी हो जगण्यास…..
तू काढलीस आम्हा पडद्या तुनी बाहेर…. हाती शिक्षण देऊन सोडली पाळण्याची दोर.. जीवन आमचे हो बंदिस्त स्वतःला करून उध्वस्त दीप लाविले दारोदारी देऊन ज्ञानाची शिदोरी..
अन्यायी हा समाज तू जुमानले नाही त्याज शेण, चिखल झेलून त्रास केला हो सहन..
सती प्रथा केशवपन अनिष्ट प्रथा या बंद करून दिव्य ज्ञानाची ज्योत लावून केले जागे हो मन मन..
स्त्री ही आहे हो माणूस ओरडून सांगे हो जगास बुद्धी चातुर्याचा तिला होता हो विश्वास जन्म दिला तिने आज प्रतिभाताई पाटील द्रोपदी मुर्मु यास..