वेड… सुखं कळले म्हणून सूर जुळले..!

 

वेड मराठी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमाग्रहात जाऊन बसल्यानंतर, चित्रपटाला सुरुवात झाली आणि मुंबई गेट ऑफ इंडिया व स्व. विलासराव देशमुख यांचे चित्र डोळ्यांसमोर पाहून अतिशय आनंद झाला. प्रेम असते प्रेमासारखे कोणी प्रेमात वेडे होतात तरी कोणी वेड्यासारखे प्रेम करतात अशीच एक कहाणी असणारा चित्रपट म्हणजे वेड..!

‘वेड’ चित्रपटाच्या रूपात ‘मजिली’ या तेलुगू चित्रपटाचा मराठी रिमेक रसिकांच्या भेटीला आला आहे. रितेश देशमुखचं पहिलं वहिलं दिग्दर्शन, जिनिलीया देशमुखची मराठीतील एंट्री आणि अजय-अतुलचं संगीत अशा बऱ्याच कारणांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रितेशनं प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं आहे. दोन्ही नायिकांसोबतची रितेशची अफलातून केमिस्ट्री सर्वात मोठा प्लस पॅाइंट ठरला आहे..!

चित्रपटाला सुरुवात मैदानात क्रिकेट सुरु झाले. सिद्धार्थ जाधव यांचे सुत्रसंचालन अतिशय धमाकेदार चालू होते. जिल्हा वर्ल्ड सिरीज नावाचे मैदान थोड्या वेळाने रितेश देशमुख म्हणजे सत्याची जोरदार एन्ट्री सत्या हा सर्वात वेगवान खेळणारा क्रिकेटपटू सत्याच्या टीमने हा डाव जिंकला आणि सर्व क्रिकेटच्या टीमच्या विनंतीने सत्याला पार्टी करू या म्हणून चला म्हटले. सत्या लगेच बोलला जाऊ आपण पार्टी करायला परंतु मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये रूम नंबर 606 मध्ये रूम बुक करा तिथं गेल्यावर सत्याच्या डोळ्यासमोर त्याच अधुर स्वप्नं..!

सत्याला क्रिकेटमध्ये भाग घेण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून तो लाईटचे काम करण्यासाठी एका कार्यक्रमात त्याला बोलावलं तिथं लाईट लावण्यासाठी त्याला आठ हजार रुपये मिळाले त्या कार्यक्रमात दोन छोटे मुलं सत्याला बोलताना थोडं गोंधळामध्ये टाकतात. आणि त्याठिकाणी सत्याचा मुखातून एक शब्द बाहेर निघाला आणि तो म्हणाला आज ज्यांचा कार्यक्रम आहे. त्यांचे अगोदरच दोन विवाह झाले. ही बातमी सर्व मंडपात गेली इकडचे आणि तिकडचे पाहुणे यांची हाणामारी झाली..!

लगेच थोड्या वेळात निशा नावाची मुलीची एन्ट्री होते आणि ती सर्वाना शांत करते. आणि विचारते तुम्हाला कोणी सांगितला हा प्रकार की, यांचे दोन विवाह झाले. तो म्हणतो यांनी ती म्हणतो त्यांनी शेवटी मात्र जी महिला ऐकते ती म्हणते अरे तो लाईट फिटिंग वाला आला ना त्यांनी बोलला हा, पुढे हाच राग मनात धरून निशा ही क्रिकेटच्या मैदानात जाते तिथं सत्याच्या मॅच चालू असते. सत्या हा खूप वेगाने क्रिकेट खेळू लागला तेवढ्यात निशा ही त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या डोळ्यावर लाईट चमकवते आणि त्याच्या डोक्याला बॉल लागून तो खाली पडतो. तेंव्हा कोच सत्याला क्रिकेटच्या बाहेर काढतात. जेंव्हा सत्यासोबत जी घटना घडली त्या घरी जाऊन खरोखर सांगतो तेंव्हा मात्र निशा सुद्धा सत्याच्या प्रेमात पडते..!

एखाद्या गोष्टींची हट्ट तोपर्यंत करावी ती मिळवायची असते..!

सत्याचे वडील दिनकरराव ते म्हणजे अशोक सराफ सत्या आणि निशा प्रेमात मग्न झाले. निशाने सत्याला गिफ्ट म्हणून वाकम्यान दिला त्याला वेड लागले गाणे ऐकण्याचे पुढे लगेच भास्कर अण्णा नावाचा गुंड यांना सत्या आणि निशाची प्रेम कहाणी कळाली आणि भास्कर अण्णा याची नजर निशावर गेली. सत्या आणि निशा एकत्र भेटतात तेंव्हा भास्कर अण्णा निशाची छेड काढण्यासाठी गेले असता सत्याने भास्कर अण्णाला मारले पुढे निशा आणि सत्या दोन्ही धावत धावत त्यांच्या संकटातुन निघून जातात. सत्या निशाला घेऊन त्याच्या घरी गेला तेंव्हा वडील दिनकरराव विचारतात सत्या ही कोण घेऊन आला तर सत्या म्हणाला जसे तुम्ही माझे जग तर ही पण माझे जग मी निशावर प्रेम करतो म्हणून वडिलांना सांगितलं..!

पुढे निशाच्या वडिलांना भास्कर अण्णा यांनी घरी जाऊन सांगितले की, तुमची मुलगी सत्याच्या प्रेमात पडली तिला आवरा नाही तर उगच बर वाईट होईल नंतर निशाला घराबाहेर तिच्या वडिलांनी पडू दिले नाही. आणि सत्याला मारण्यासाठी कॅप्टन म्हणजे निशाचे वडील यांनी भास्कर अण्णा यांना सांगितलं सत्याला घराच्या समोर दिसू देऊ नका. भास्कर अण्णाचे गुंड सत्याच्या मागे लागतात तेंव्हा निशा येऊन सत्याला गाडीमध्ये बसवून मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये रूम नंबर 606 मध्ये एक दिवस फक्त थांबण्यासाठी सांगते. तेंव्हापासून सत्या आणि निशाची पुन्हा भेट कधीच होत नाही..!

पुन्हा निशा सोडून गेल्यावर सत्याला वेड लागलं सिगारेट आणि दारूचे तो खूप मोठ्या प्रमाणात व्यसनेच्या आहारी जाऊन बसतो. काही दिवसांनी सत्याचे लग्न झाले श्रावणी सोबत ती म्हणजे जेनीलिया देशमुख श्रावणी ही बाजारात खरेदीसाठी निघाली तेंव्हा भास्कर अण्णा व त्याची गुंड श्रावणीला छेडतात तेंव्हा सत्याला कळते सत्या जाऊन सर्वच गुंडांना बेदम मारहाण करतो तेंव्हा भास्कर अण्णा हे सत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात..!

तेंव्हा ज्यांच्यासाठी हे भांडण झाले त्यांना बोलवा असे पोलीस बोलतात तेंव्हा लगेच जेनेलिया म्हणजे श्रावणीची इन्ट्री ऑटोने भर पावसात छत्री घेऊन होते ती पोलीस स्टेशनमध्ये पोहचते तेव्हा, रात्र झालेली असते. पोलीस म्हणतात सत्याला आणि गुंडांना आजचा दिवस पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागेल जर गुन्हा नोंद करायचा असेल तर श्रावणी लगेच बोलते मला तक्रार नोंद नाही करायची म्हणून सत्याला घरी घेऊन जाते..!

श्रावणी ही रेल्वेच्या ऑफिस मध्ये नौकरीला असते. सत्या तिच्या ऑफिसला जातो आणि श्रावणीकडून दोन हजार रुपये घेऊन जाऊन दारूच्या अड्यावर दारू पितो बोलता बोलता सत्या श्रावणीला म्हणतो श्रावणी मी तुझ्याकडून आजपर्यंत सत्तर हजार पाचशे अंशी रुपये घेतलो श्रावणी म्हणते मी कधी तुमचा हिशोब मागितला तेंव्हा सत्या म्हणतो घरातील एकाने तरी हिशोब ठेवला पाहिजे. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते, सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते, पतीसाठी वडीलांसोबतही भांडते..!

असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का होत नाही तर श्रावणी ही एकतर्फी सत्यावर प्रेम ही लहानपणापासून करायची पण ते सत्याला माहिती न्हवत. पण ती त्याला सांगते तेंव्हा सत्यामध्ये थोडा थोडा बदल होत चाललेला दिसतो. दिनकरराव बोलतात ज्या मुलांना आपण लहानपणी हात धरून चालायला शिकवलं आज तीच मुलं मोठे झाल्यावर सुद्धा त्यांना दारूच्या नशेमुळे चालता येत नाही. अशी खंत व्यक्त केली. पुढे सत्यामध्ये थोडा थोडा बदल होताना दिसत होता तो कोच सरांना फोन लावला आणि पुन्हा तो क्रिकेटच्या मैदानात दिल्ली येथे नौकरीसाठी गेला..!

तिथं कोच म्हणून त्याची निवड करण्यात येते. लहान मुलांना तो क्रिकेट शिकवतो तिथं खुशी नावाची लहान मुलगी क्रिकेट शिकण्यासाठी असते. ती शिकत असताना सत्याला जरा वाईट बोलते मग सत्या तिला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी देत नाही. सत्या कोच असल्याने त्याच्या मनावर असते. खुशी ही कॅप्टन यांची नात आणि निशाची मुलगी असते. जेंव्हा सत्याला समजते तेंव्हा सत्या कुशीला घेऊन त्याच्या गावाकडे घेऊन जातो आणि तिला क्रिकेट खेळण्याची तयारी करून घेतो..!

 

 

घरी तिला घेऊन आल्यावर दिनकरराव आणि श्रावणी हे त्याची विचारपूस करतात ही छोटी मुलगी कोण म्हणून तर तर सत्या हा निशाची मुलगी म्हणतो तेंव्हा सत्याच्या घरी थोडी चलबिचल होते. पुढे खुशी ही गुणवान आणि तितकीच हुशार पण सत्यामध्ये बदल घडवून आणणारी ती पण खुशी सत्या हा खुशीचा शब्द खाली पडू देत नसायचा आणि श्रावणी ही खुशीचा लाड आणि तिची काळजी ही मनापासून घेते. खुशीला रेल्वेमधुन क्रिकेट खेळायचं म्हणून तिच्या आईचे स्वप्नं तेच स्वप्न अगोदर सत्याने पाहिलं त्याच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी निशाने आपल्या मुलींमध्ये क्रिकेटची आवड निर्माण केली..!

 

 

परंतु निशाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ही बातमी कॅप्टनने म्हणजे निशाच्या वडिलांनी सत्याला दिली. सत्या खूप नाराज झाला. पुढे खुशीला रेल्वेमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी वारसा हक्काचे प्रमाणपत्र लागू लागले म्हणून सत्याने तिला दत्तक घेण्यासाठी सर्वांशी परवानगी घेतली आणि खुशीला दत्तक घेतले पुढे रेल्वे क्रिकेट सामना खेळण्यासाठी खुशीला घेऊन मुंबई येथे गेले. आणि खुशीला तिथं यश संपादन सुध्दा झाले. पुढे घराकडे जाण्याची तयारी जाता जाता पुन्हा तेच उजाळा सत्याच्या डोळ्यासमोर म्हणजे मुंबई ताज हॉटेल रूम नंबर 606 कारण याच ठिकाणी निशाची शेवटची भेट तो श्रावणीला आणि सर्वांना सांगितला तुम्ही पुढे चला मी येतो..!

 

 

 

लगेच श्रावणीचे नौकरीची पदोन्नती तिला प्राप्त झाली. आणि तिची बदली नागपूरला झाली घरी सर्वाना कळाले सर्वजण श्रावणीला नौकरी सोड, तू नौकरी करू नको, अस म्हणू लागले. परंतु सत्या काही श्रावणीला बोलला नाही, खुशी ही सुद्धा खूप वेदनादायी रडत होती. मला नको ना ग सोडून जाऊ आई परंतु शेवटी श्रावणी नागपूरला जाण्यासाठी निघाली. सोबत सत्या श्रावणीच्या लग्नाला 7 वर्षे होऊन सुध्दा ते कधी प्रेमाने बोलू शकले नाही. पुढे चालत चालत रेल्वे स्टेशन आलं सत्या बोलता बोलता श्रावणीला म्हणाला नागपूरला जाणे गरजेचे आहे का? जाऊ नको परंतु श्रावणी ही इथं थांबण्यासाठी नकार दिला कारण आजपर्यंत मी 7 वर्ष झाले. तुमच्या सोबत राहते कधी माझ्यावर तुम्ही बायको नावाचा अधिकार गाजवला नाही..!

 

 

 

आणि ज्या दिवशी मुंबईला खुशीसाठी क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेलो त्यादिवशी तुमची धाव ही ताज हॉटेलकडे होती. ना मग मी कशाला तुम्हाला अस बोलल्यावर सत्या बोलतो. वेगळं होताना निरोप घेता आला पाहिजे आणि त्यादिवशी मी निशाला निरोप देण्यासाठी गेलो होतो. आणि श्रावणी मी दारू पिताना माझा तोल गेला तर सावरायला ती होती. आणि मी जीवनाला कंटाळलोय तर आवरायला सुध्दा ती होती. आपल्याला एकत्र करण्यासाठी सुध्दा खुशीच्या माध्यमातून सुध्दा ती होती. एवढं सारं ऐकून श्रावणी आणि सत्या हे शेवटी एकत्र आले आणि नागपूरला जाणे श्रावणीचे रद्द झाले. काही लोक प्रेमात वेडे होतात तर काही लोक वेड्यासारखे प्रेम करतात..!

 

 

 

 

शब्दांकन

– युवा साहित्यिक : सोनू दरेगावकर, नांदेड..!
——————————————————
●●●●●● संपर्क : ●●●●●●
📲 मो. 7507161537
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *