सन्मानानी बोलवले तर पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार- प्रा. मनोहर धोंडे

गद्दारांचा इतिहास लिहिला जात नाही…..!

गेल्या 35 वर्षापासून मी शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम केला आहे. आजही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे .2014 च्या निवडणुकीत मला डावळुन गद्दार झालेल्या खासदाराच्या सांगण्यावरून प्रताप पा. चिखलीकर यांना उमेदवारी दिली होती.त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी भूमिका ऐकून घेतली नसल्याने माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचली होती. मी फक्त शिवसेनेचे काम थांबवलं आहे, मी शिवसेना सोडली नाही किंवा मला शिवसेनेतून काढण्यातही आलं नाही त्यामुळे आजही मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. 2014 पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेलाच पाठिंबा दिला आहे त्यामुळे गद्दारी माझ्या रक्तात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शिंदे गटात येण्याचं निमंत्रण दिलं होतं परंतु गद्दारांचा इतिहास लिहिला जात नाही म्हणून मी कुठेच गेलो नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सन्मानाने बोलवले तर पुन्हा शिवसेनेत सक्रिय होईल असे प्रतिपादन शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी कार्यकर्ता संकल्प बैठकीमध्ये बोलताना केले आहे.

विधानसभा निवडणुक दोन वर्षावर आली आहे.2024च्या निवडणुकीत शिवा संघटन निवडणूकीत प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे.शिवा “संघटना, नवा विचार नवा ,संकल्प” घेऊन शिवा स्वराज्य पक्षाची स्थापना करत आहे.प्रा.मनोहर धोंडे यांनी 35वर्ष शिवसेनेचे काम केले आहे.सध्या शिवसेनेत मोठे बंड झाले असल्याने प्रा.मनोहर धोंडे यांना शिवसेनेत सक्रिय होण्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.याच संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा यासाठी प्रा.मनोहर धोंडे यांनी शेवडी येथे लोहा -कंधार विधानसभा कार्यकर्ता संकल्प बैठक घेण्यात आली या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रा. मनोहर धोंडे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठाम राहण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.या बैठकीला आठशे ते नवशे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रा.मनोहर धोंडे यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले.तुम्ही कोणताही निर्णय घ्या ,आम्ही तुमच्या सोबत आहोत यावेळी कोणालाही पाठींबा न देता विधानसभा निवडणूक लढवा अशा एकमुखी निर्णय संकल्प बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजेनाथ तोंडसुरे, धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी, कालीदास मुस्तापुरे, बाला पाटील मानसपुरे, विक्रम पाटील बामणीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लक्ष्मण मोरे यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. मनोहर धोंडे बोलताना म्हणाले की, शिवा संघटनेचा नवीन पक्ष काढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर केली आहे. अनेक पक्षातील नेत्यांनी माझ्याशी संपर्क करून “नवीन पक्ष काढू नका; आमच्या पक्षात या “अशी साद घातली आहे .परंतु मी गेल्या 35 वर्षापासून बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. संघटनेत व शिवसेनेत काम करताना मी माझा स्वाभिमान जपला आहे .आमदारकी , खासदारकी व मंत्रीपदासाठी अनेक लोक तत्व ,निष्ठा, स्वाभिमान विकत असतात परंतु मी माझा स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही. आजही माझ्या कंधार, लोहा संभाजीनगर येथील कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,कै. मीनाताई ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटो आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवा संघटनेची राजकीय भूमिका ठरवायची आहे . शिंदे गटाकडूनही मला निमंत्रण आला आहे परंतु २० जून रोजी शिंदे यांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणणारा मी पहिला व्यक्ती आहे, अशा गद्दारांसोबत मी जाऊ शकत नाही.त्यामुळे नवीन पक्ष स्थापन करण्याची माझी पूर्ण तयारी झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काही नेत्यांनी पक्ष काढू नका शिवसेनेत सक्रिय व्हा असे सांगितले असल्याने यासंदर्भात मी शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेत आहे. लोहा- कंधार मतदार संघ हा माझा जन्मभूमी असल्याने या मतदारसंघातही कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज कार्यकर्ता संकल्प बैठकीचे आयोजन केले आहे. शिवसेनेत जायचं की नवीन पक्ष स्थापन करायचा हे शिवा संघटनेच्या वर्धापन दिनी म्हणजे 28 जानेवारी रोजी मी जाहीर करणार आहे. तोपर्यंत शिवसैनेकडून स्वाभिमानाने बोलवणे आले तर पुन्हा शिवसेनेत सक्रिय होण्याचा विचार करेल असे प्रतिपादन प्रा. मनोहर धोंडे यांनी केली आहे

या बैठकीलाबाळू पाटील ढेंबरे, शैलेश ढेंबरे, नागोराव पाटील सिरसाठ, मलकू अप्पा किडे, मारोतराव सोनवळे, अप्पाराव राजाळे पेनूर वैजेनाथ स्वामी, प्रल्हाद पाटील घोरबांड, गजानन होळगे, अंकुश पाटील कदम, शंकर नरबले, लक्ष्मण केंद्रे, क्शिन मास्तर ढगे, विश्वनाथ भोसीकर, दामोदर वाटे, बालाजीराव ठेवावी. डोम, दगडू पाटील तोंडचिरे, निखिल किडे, संदिप पाटील गायकवाड, रवि होळगे, गणेशराव राठोड, अमोल कंधारकर, शिवाजी आंबेकर, दशरथ श्रीरामे, ज्ञानेश्वर मानसपुरे, वसंत शिंदे, नवनाथ दगडगावे, संभाजी होळगे, आंगदराव गोरकटे, बंडू पाटील जामगे, सुर्यकांत आणेराव, बाळू पाटील जामगे, धारोबा घोरबांड, प्रताप पाटील, कपिल पाटील , हनुमंत भाऊ लांडगे, उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, सरपंच कैलास घोडे, सुर्या आणेराव, शिवा व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानोबा मानसपुरे आदी सह आठशे ते नऊशे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *