कंधार/प्रतिनिधी “चौथास्तंभ पुरस्कार ” हा अप्रतिम मीडिया तर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात वरिष्ठ पत्रकार नितीन मोरे यांना दर्पण दिनी प्रदान करण्यात आला. यावेळीही व्यासपिठावर विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, विशेष गौरवमूर्ती एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक आणि समृध्दी महामार्ग प्रमुख राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, अभिनेते मंगेश देसाई, निमंत्रक रणजीत कक्कड उपस्थित होते.
या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक अप्रतिम मीडिया चे संचालक डॉ अनिल फळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन निमंत्रक श्री विवेक देशपांडे यांनी केले.
यावेळी विविध मान्यवर, पुरस्कारार्थिंचे कुटुंबीय,स्नेही, मोठ्या संख्येने उपस्थित होते.