शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा फुले हायस्कुलचे नेत्रदीपक यश १८ शिष्यवृत्तीधारक ,४८ विद्यार्थी पात्र

नांदेडदि. १२ पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा भवन शिक्षण संस्थेच्या बाबा नगर येथील महात्मा फुले हायस्कुलचे १८ शिष्यवृत्तीधारक तर ४८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी मधील शाळेतील 131 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील सृष्टि शिवहार किडे, अनिकेत रितेश कल्याणकर, सिध्दी राजेश झुंबाडे, श्रेया ईश्वर जाधव, सिध्दीका ग्यानोबा वखरे, स्वप्निल साईनाथ कदम, सोहम माधवराव इंगळे, किरण रामराव शेंडगे, रणविर प्रताप केंद्रे, अमेय शिवानंद टपरे, मनिष श्यामसुंदर नागरगोजे, व्यंकटेश गजानन रूद्रवार, नैतिक संजय चव्हाण, दत्तात्रय साईनाथ तेलंग, युवाराज दत्ता रामरूपे, श्रेयश्री मनोहर शिंदे, आनंद प्रल्हाद सेवकर, मिथीलेश नागभुषन बुस्सा हे १८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर ४८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ अमिताताई चव्हाण, सचिव डी.पी. सावंत, सहसचिव उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र चव्हाण, पांडूरंगराव पावडे, प्रशालेचे मुख्याध्यापक एस.के. तायडे, उपमुख्याध्यापक एम.डब्ल्यु. कल्याणकर, पर्यवेक्षक एस.एन. सुर्यवंशी आणि सौ.जे.बी.बनसोडे, जी.डी.दरबस्तवार आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *