आपण खेड्यातून शहरात आलो.शिकलो.मोठे झालो.पैसे कमावले.नाव झालं.पण माझ्या खेड्यातच शिकणाऱ्या लहान लहान लेकरांना गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळत नाहीत.त्यांना आणखी संगणकाची ओळखच झाली नाही.अशा लेकरांना, त्यांच्या शाळांना आपल्या मेहनतीच्या कमाईतून हज्जारो पुस्तकंन् शेकडो संगणक पाठविणारा ग्रामपुत्र प्रदीप लोखंडे यांचा पत्ता ‘पुणे -१३’ एवढाच आहे.
एकटा माणूस.पाठवून पाठवून किती पुस्तकंन् संगणक पाठवील?त्यांनी ‘ग्यान की’ची स्थापना केली.मग या माणसानं आवाहन केलं,पैसेवाल्या लोकांना.लोकांनी आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला… आणि काय चमत्कार बघा,लोकांनी प्रदीप लोखंडे यांच्यावर विश्वास ठेवला.करोडो रुपयांचे संगणक आणि पुस्तकं निघाली खेड्यांकडं…मुलं पुस्तकं वाचून,संगणक शिकून समृद्ध होऊ लागली.आता ‘ग्यान की‘ या चळवळीनं खेड्यापाड्यातली मुलं समृद्ध केली.करीत आहे…
एका माणसानं मनात आणलं तर काय चमत्कार करू शकतो…याचं जीतं जागतं उदाहरण म्हणजे प्रदीप लोखंडे! शिकून पुढं गेलेला आणि मागून येणाऱ्यांना प्रेमाचान् सहकार्याचा हात देणारा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला हा माणूस.या माझ्या प्रिय माणसाचा आज जन्मदिवस आहे.अशाच भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रदीप सरांना बम्बाट बम्बाट सदिच्छा!