कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे , येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या.. — खा. प्रतापराव पाटील चिखलीकर..

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या झंझावात बुथ संवाद दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारले नवचैतन्य..

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

कार्यकर्त्यांनो भाजपा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजे योग्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याच्या निवडणुका होत, असे प्रतिपादन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपा बुथ संवाद दौऱ्यात फुलवळ येथे कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधताना व्यक्त केले.

फुलवळ येथे ता.९ जानेवारी २०२३ रोज सोमवारी भाजपा बुथ समिती संवाद व गावकऱ्यांच्या गाठीभेटी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

यावेळी मा. जि.प. सदस्या तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता ताई देवरे / चिखलीकर , प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा चित्ररेखा गोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम पाटील तेलंग, तालुका अध्यक्ष भगवान राठोड, म.जफरोद्दिन बाहोद्दिन, प्रा.किशनराव डफडे, मधुकर डांगे, साईनाथ अप्पा कोळगिरे, सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे, मुंडेवाडी चे सरपंच ज्ञानोबा माऊली मुंडे, चेतन केंद्रे, विठ्ठल तुप्पेकर, जंगमवाडी चे सरपंच प्रतिनिधी श्याम वाडीकर, रजत शहापुरे, माधव वाघमारे, डि.टी. मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

 

पुढे बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की आजपर्यंत आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व सवंगडी कार्यकर्ते सोबत घेऊन संघर्ष करत निवडणुकीमध्ये विजयाची पताका फडकविली आहे. निवडणुकीमध्ये सहज यश प्राप्त करता येत नाही त्यासाठी वाडी, तांडे व गाव पातळीपर्यंत जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे ठरत असते. भाजपा या पक्षात कार्यकर्त्यांना काम करण्याची खूप मोठी संधी मिळत असते आणि या पक्षात शिस्तीचे पालन करत खऱ्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. त्यासाठी आपण प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहून पक्षाचे काम करा, आपल्या कामाची निश्चितच दखल घेतल्या जाईल असेही ते म्हणाले.

 

 

 

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बुथ समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी दिलखुलास संवाद साधत गावागावातील अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने खचून जाण्याचे कारण नाही. तूमचे कोणतेही काम कुठेच अडणार नाही अशी हिंमत खा.चिखलीकरांनी कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे खा.चिखलीकरांच्या बूथ समिती संवाद दौऱ्यामुळे नवतरुण कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा “कमळ” फुलविण्यासाठी नवतरुण कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भाजपा बुथ समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी भगवान राठोड, प्रणिता ताई देवरे यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक धोंडीबा बोरगावे यांनी केले तर सूत्रसंचालन विश्वांभर बसवंते तर उपस्थितांचे आभार दत्ता डांगे यांनी मानले. यावेळी फुलवळ सर्कलमधील भाजपा कार्यकर्त्यांसह फुलवळ ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *