येथील प्रबोधनकार संजय महाराज नागपुर्णे यांच्या वडिलांच्या ( दत्तात्रय तुकाराम नागपुर्णे ) १६ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने अहमदपूरात आज निमंत्रितांचे कविसंमेलन, बाप या विषयावर परिसंवाद आणि भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा संजीवकुमार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनाचे सुत्रसंचालन विद्रोही कवी राजेंद्र कांबळे करणार आहेत. तर प्राचार्य श्रीरंग खिल्लारे उदघाटन करणार आहेत.कविसंमेलनात युवा कवी शिवा कराड, वैजनाथ गित्ते, प्रा अनिल चवळे, प्रा भगवान आमलापुरे,प्रफुल्ल धामणगावकर, कवयित्री वर्षा माळी, प्राचार्य तुकाराम हरगिले,मिना तौर, रंजना गायकवाड, मुरहारी कराड,शिवाजी नामपल्ले, समियोद्दिन अहेमदपुरी,,डॉ आर के सर,संजय तिडके, नवोदित युवा कवी गणेश चव्हाण, सुभाष साबळे,शिवाजी स्वामी उदगीर, वैजनाथ कांबळे हडोळती आणि एन डी राठोड सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी ०४ : ३० वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय कार्यालय ,दिपवर्षा मंगल कार्यालयाच्या पाठिमागे सुर होणाऱ्या या कविसंमेलनानंतर लगेचच बाप या विषयावर परिसंवाद आणि भजनसंध्या रंगणार आहे.परिसंवादाचे वक्ते बाबासाहेब मोरे बीड आणि प्रमुख पाहुणे विजय कानगुलकर हे आहेत.या अक्षर सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक प्रबोधनकार संजय महाराज नागपुर्णे आणि एन डी राठोड यांनी केले आहे.