राजीव गांधी महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा

मुदखेड ;  राजीव गांधी महाविद्यालयात मुदखेड़ येथे हिंदी विभागांतर्गत विश्व हिंदी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला . या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. रमेश कदम यांनी भूषविले तर यंशवत महाविद्याल, नादेंड येथील हिंदी विभागातील प्रा. डॉ. ज्योती मुंगल ह्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या . त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून हिंदी भाषेत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असे सांगितले . तसेच अभ्यासक्रमाबदल ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. रमेश कदम यांनी विश्व हिंदी दिवसानिमित्त शुभेच्या दिल्या . तसेच हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. व्ही . सी. ठाकुर यांनी केले . आयोजन डॉ. कोल्हे, डॉ. सावते यांनी केले . सुत्रसंचालन नीना वाटेगावकर हीने , अतिथि परिचय संभाजी कदम, आभार अंकुश वाघमारे या विद्दार्थ्यानी केले तसेच मनोगत भूगोल विभाग प्रमुख डॉ. कोटलवार, डॉ .जाधव यांनी केले . कविता वाचन गोपाल कृष्ण ने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *