‘प्लेग’च्या साथीने मृत्यू स्वीकारून समाजासाठी फुले दांपत्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय -डॉ. दिलीप पुंडे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पादचारी व वाहतूक नियमन मार्गदर्शक परिपत्रक विमोचन,
‘जिप्सी’ माॅर्निंग ग्रुपचा स्तुत्य उपक्रम ..

मुखेड: प्रतिनिधी

स्त्री शिक्षणाची जननी ही सावित्रीबाई फुले आहेत, त्यासाठी स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांच्याप्रती सदैव कृतज्ञ असणे गरजेचे आहे. महिलांची शाळा, परीत्यक्त्यासाठी सुश्रुषागृह वंचितांसाठी पाण्याची सोय असे विविध कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीने मृत्यू स्वीकारून समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन मुखेड भूषण तथा जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. दिलीप पुंडे यांनी केले.

येथील ‘जिप्सी’ मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आयोजीलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पादचारी व वाहतूक नियमन मार्गदर्शक परिपत्रक विमोचन व जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा -हदयराज डॉ. अशोक कौरवार, बालरोगतज्ञ डॉ. रामराव श्रीरामे, दंतरोग चिकीत्सक डॉ. पांडुरंग श्रीरामे, सुप्रभातचे संघटक अशोक कोत्तावार, अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, जिप्सीचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे, अध्यक्ष जय जोशी, अखरगा सरपंच प्रतिनिधी संदीप काळे, पं.स.चे माजी उपसभापती कल्याणराव पाटील, उपसरपंच श्रीराम पाटील, चेअरमन दिगंबर गोपनर, प्रा. डॉ. सौ. मनीषा जोशी, उत्सवमूर्ती जिप्सी भूषण भलभीम शेंडगे, सौ. लक्ष्मी शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते पादचारी व वाहतूक नियमन मार्गदर्शक परिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सौ. मनिषा देशपांडे, प्रीती सदावर्ते, सौ. लक्ष्मी शेंडगे, सौ. सविता मोहटे, सौ. कविता शेंडगे या सावित्रीच्या लेकीचा सन्मान करण्यात आला. डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले नसते तर बहुजनांसाठीची शिक्षणाची दारे उघडली नसती. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा पाया या दांपत्याने रचला, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकताना ते म्हणाले की, सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला, शिवबा आधी नमस्कार राज मातेला. जिजाऊ नसत्या तर हिंदवी स्वराज्य निर्माण झाले नसते. उत्सवमूर्ती भलभीम शेंडगे यांना शुभेच्छा देताना म्हणाले की, शेंडगे म्हणजे भोळाभाबडा कार्यकर्ता. सर्वांच्या मदतीला धावणारे ते सर्वांना मदत ते करतात. जिप्सी मॉर्निंग ग्रुप हा युवा पिढीचा. मागील चार वर्षाचे कार्य उल्लेखनीय आहे मुखेड हे चळवळीचे शहर आहे वैद्यकीय संस्था, सुप्रभात मित्र मंडळ, इंडियन रेड क्रॉस, आर्ट ऑफ लिविंग, भीमाई व्याख्यानमाला आदी सेवाभावी संस्थामार्फत अनेक कार्य होत आहेत.
डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून अनेक कार्य होत आहेत.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम कोत्तावार ऑइल मिलमध्ये होत आहे ही मुखेडवासीयांसाठी प्रेरणादायी बाब आहे. जिप्सी भूषण बलभीम शेंडगे हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत आगलावे सर जोशी सर व जिप्सीयन्सच्या पुढाकारातून हा एवढा मोठा कार्यक्रम संपन्न झाला याबद्दल मी सर्व जिप्सयन्सचे कौतुक करतो. यावेळी डॉ. अशोक कौरवार म्हणाले की, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. सावित्रीबाई यांनी केलेल्या कार्यामुळेच सर्व महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करताना दिसून येत आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून पादचारी व वाहतूक नियमन मार्गदर्शक परिपत्रक विमोचन करण्यात आले ही अत्यंत प्रेरणादायी व अनुकरणीय बाब आहे.

पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यास अपघाताचा संभव कमी असतो. जिप्सीच्या माध्यमातून परिपत्रकाचे विमोचन करून समाजाला दिशा देण्याचे काम जिप्सीने केलेले आहे.

उत्सवमूर्ती बलभीम शेंडगे म्हणाले की, फुले दांपत्याचे कार्य हे अतुलनीय आहे त्यामुळे त्यांना भारतरत्न ही पदवी देण्याचा विचार शासनदरबारी व्हावा. यावेळी डॉ.रामराव श्रीरामे, डॉ. एम.जे. इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. बलभीम शेंडगे यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी पादचारी व वाहतूक नियमन मार्गदर्शक परिपत्रक विमोचन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिप्सी भूषण बलभीम शेंडगे यांनी सत्काराला उत्तरदेत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिप्सीचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ.मनीषा जोशी यांनी केले तर जिप्सी चे अध्यक्ष प्रा. जय जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

बलभीम शेंडगे यांचा परिचय जिप्सीचे सचिव बालाजी तलवारे यांनी करून दिला. कार्यक्रमास जिप्सीचे सचिव बालाजी तलवारे, कोषाध्यक्ष वैजनाथ दमकोंडवार, उत्तम अमृतवार, डॉ. प्रकाश पांचाळ, नामदेव श्रीमंगले, हनुमंत गुंडावार, सुरेश उत्तरवार, अरुण पत्तेवार, राजेश भागवतकर, उमाकांत डांगे, विठ्ठल बिडवई, गोविंद जाधव, सुरेंद्र गादेकर, आकाश पोतदार, विठ्ठल मोरे, सागर चौधरी, श्रीकांत घोगरे, योगेश पाळेकर, गजानन मेहकर, बालाजी वडजे, साईनाथ कोत्तापल्ले, रामदास सुंकेवार या जिप्सीयन्ससह डॉ. एस.एन. कोडगीरे, आर.जी. स्वामी, डॉ. पी.बी. सितानगरे, गोपाळ पत्तेवार, उत्तम अण्णा चौधरी, सुर्यनारायण कवटीकवार, चंद्रप्रकाश चौहान, विजयकूमार भांगे, अनिल पेदेवाड, सरवर मनियार, सुप्रभात मित्र मंडळाचे सदस्य, डॉक्टर्स, वकील, पत्रकार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *