खाजगी प्राथमिक शिक्षकांचे वेतन थांबविणार नाही -शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे

नांदेड ; आर.टी.ई. कायद्या अन्वये खाजगी प्राथमिक शाळांना दर तीन वर्षांनी मान्यता नूतनीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शाळा आर.टी.ई. कायद्या अन्वये शाळा मान्यता नूतनीकरण करणार नाहीत अशा शाळांचे वेतन थांबविण्यात येईल असा आदेश शिक्षणाधिकारी जि.प.नांदेड यांनी वेतन पथकाला दिला होता. या संदर्भात महासंघाने खाजगी शाळांचे नियमित वेतन थांबविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. याचाच एक भाग म्हणून दि. १७ जानेवारी रोजी महासंघाने जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष एल. एम. जाधव व जिल्हा सचिव एच. के. डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या शिष्टमंडळाने जि.प. च्या शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीमती सविता बिरगे यांची भेट घेऊन आर.टी.ई. कायद्या अन्वये शाळा मान्यता नूतनीकरणाच्या कारणामुळे शिक्षकांचे नियमित वेतन थांबवू नये या मागणीचे निवेदन देऊन शिक्षणाधिकारी सोबत सविस्तर चर्चा केली.

या चर्चेत अतिसकारात्मक प्रतिसाद देत खाजगी शाळांचे नियमित वेतन रोकले जाणार नसल्याचे शिष्ट मंडळाला आश्वासन दिले. चर्चेत खाजगी प्राथमिक शाळांनी लवकरात लवकर आर.टी.ई. कायद्या अन्वये नूतनीकरणाचा प्रस्ताव शिफारशीसह मान्यते साठी शिक्षणाधिकारी कार्यलयात दाखल केल्यास सात दिवसाच्या आत मान्यता दिली जाईल असे शिक्षणाधिकारी बेरगे म्हणाल्या.

तसेच वेतन देयकासोबत प्रस्ताव दाखल केल्याचा पुरावा जोडावा असे शिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना सांगितले. या मुळे खाजगी शाळांचा वेतनाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. चर्चेत शिक्षणाधीकारी यांनी खाजगी प्राथमिक शाळांच्या संदर्भात सहविचार सभा घेण्याविषयी शिष्ट मंडळाला आश्वासित केले.

यावेळी चर्चेत उपशिक्षणाधिकारी बंडू अमदापूरकर साहेब, अधिक्षक शेटकार , महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष एल. एम. जाधव व जिल्हा सचिव एच.के.डाकोरे, प्रांत उपाध्यक्ष हरिहर चिवडे, बसवेश्वर मंगनाळे, दिगांबर वाघमारे, कंधार ता. अध्यक्ष भास्कर कळकेकर , मन्सूर अहेमद परदेशी , राजहंस शहापुरे, मु. अ. पवार , मु.अ. सुलतान खान मु.अ.पयनापल्ले, शिवाजी बरडकर, मु. अ. संतोष भालेराव देगलूर ता. अध्यक्ष दिलीप देशमुख, लोहा ता. अध्यक्ष वाघमारे, उपाध्यक्ष जोगदंड, मिर्जा साहेब,सिराज सर,गोविंद राठोड, मु.अ.पवार, गुमनर इत्यादी उपस्थित होते.

शिष्टमंडळाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्रा.) सौ. सविता बिरगे यांचे जिल्हा सचिव एच. के. डाकोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *