कंधार ; दिगांबर वाघमारे
पत्रकार शशिकांत वारिशे हत्येच्या निषेधार्थ आज कंधार येथे सर्व पत्रकारांच्या वतीने आज निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले .
पत्रकारांवर वारंवार होतं. असलेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी व या घटनांनकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कंधार तालुका मराठी पत्रकार सांघाच्या वतीने काळ्या फिती लावून कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली .
बातमी का छापली म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची गाडी खाली घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल केल्याच्या घटनां घडल्या आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून निदर्शनं करून आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
त्या अनुषंगानेच कंधार तालुका मराठी पत्रकार संघ , शाखा कंधार च्या वतीने शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालय समोर काळ्या फिती लावून निदर्शनं करत मयत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली ,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कंधार च्या वतीने पाठींबा देण्यात आला .यावेळी अँड दिगांबर गायकवाड , सत्यनारायण मानसपुरे , गणेशभाऊ कुंटेवार , राजु ठाकुर , मिर्झा जमीर बेग , भुजंग सोनकांबळे, गंगाप्रसाद यन्नावार, दिगांबर वाघमारे , माधव भालेराव , विपूल बोमनाळीकर , दयानंद कदम ,सुभाषराव वाघमारे, मारोती चिलपिंपरे , माधव जाभाडे , गोविंद शिंदे , मुरलीधर थोटे , महंमद सिंकदर , विठल कत्तरे , संभाजी कांबळे आदीसह पत्रकारांची उपस्थिती होती.