राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी केले पुष्पवृष्टिने स्वागत

लोहा /प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रयतेचे राजे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसविण्यासाठी लाखो तमाम शिव प्रेमींच्या मागणीला अखेर यश आले असून काल दिनांक 17 फेब्रुवारी शुक्रवार रोजी छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन लोहा तालुक्यात होत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी अहमदपूर तालुक्यातील सांगवी येथे जाऊन सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले, यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला.

माळाकोळी येथे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल शुक्रवारी अहमदपूरहून लोहयाकडे येत असताना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने भव्य असा तीन क्विंटलचा पंचवीस फूट उंचीचा भव्य पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घालून व पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिश बाजी करून अभिवादन केले, लोहावासियांची अनेक वर्षांची छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची प्रतीक्षा अखेर आज संपली असून माळाकोळी ते लोह्यापर्यंत जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात अखिल लोहा नगरी दुमदुमली होती,

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळात लवकरात लवकर उभारण्यासाठी लोहा, कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी वेळोवेळी तळमळीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता.  लोह्यात छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे आगमन होत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांना या ऐतिहासिक प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्वप्रथम अभिवादन करण्याचा मान मिळाल्याने मिळाल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता,

यावेळी छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ सुरेख कलाकृती व हुबेहूब अतिशय देखणा पुतळा बनविणारे अंधेरी मुंबईचे पुतळा शिल्पकार जय प्रकाश शिरगावकर यांचा पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन यावेळी आशाताई शिंदे यांनी केले, यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य रोहित रावसाहेब पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पा. चोडे, शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर ,खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार,पंचायत समिती सदस्य जनार्दन तिडके, माळाकोळी सरपंच प्र.मोहन काका शुर, सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर,केशवराव तिडके, तालुकाध्यक्ष नागेश पाटील खांबेगावकर,सुधाकर सातपुते, माधव पा. घोरबांड, सिद्धू वडजे , शुभम कदम ,प्रसाद जाधव, वसंत मंगनाळे,,राम पाटील, चकधर डोके,अवधूत पेठकर सह कार्यकर्ते पदाधिकारी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

*चौकट*
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लोह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची लाखो शिवप्रेमींची मागणी आज पूर्ण होत असल्याचा मला मनस्वी आनंद होत असून मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार आहे ही मी माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया लोहा कंधारचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *