अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आणि आर्टीच्या निर्मिती बाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आजाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या जबाब दो आंदोलनात नांदेड जिल्ह्यासह कंधार लोहा तालुक्यातील सकल मातंग बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मामा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांनी आज कार्यकर्ता आढावा बैठकीत विजयगड कंधार येथे केले .
साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टी स्थापन करण्यात यावी , अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे , लहुजी आयोगाच्या 84 शिफारशी लागू करण्यात याव्यात ,
तसेच साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ तात्काळ सुरू करण्यात यावे यासह मातंग समाजाच्या अनेक मागण्यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे जबाब तो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे . त्याचे नियोजन म्हणून दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेच्या सोय करण्यात आली आहे . नंदिग्राम एक्सप्रेस , देवगिरी एक्सप्रेस आणि राजाराणी एक्सप्रेस ने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी नांदेड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मारोती मामा गायकवाड यांनी दिली .