कंधार :- छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा न्यायालय कंधार येथे कंधार तालुका अभिवक्ता संघ कंधार यांच्या विद्यमानाने प्रमुख व्याख्याते म्हणून शेख सुभान अली यांचे शिव चरिञावर व त्याच्या इतिहासावर व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा व सञ न्यायालय कंधार येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शेख सुभान अली (जेष्ठ व्याख्याते ) है शिव चरिञावर व त्याच्या इतिहासावर व्याख्यान देणार आहेत
या कार्यक्रमाचे आयोजन कंधार तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड. एस. आय. खाँन, उपाध्यक्ष अँड. यु. जि. लुंगारे, सचिव आर. डि. सोनकांबळे, सहसचिव अँड. एस. पि. जोंधळे, कोषाध्यक्ष अँड. डि. टी. देशमुख, ग्रंथपाल अँड. डि. एस. बस्वदे, महिला प्रतिनिधी अँड. वर्षाराणी जोंधळे व सर्व सन्माननिय सदस्य अभीवक्ता संघ कंधार आदिनी आयोजित केले आहे.