कंधार तालुक्यातील फुलवळ येथील नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावरील उंच टेकडीवर असलेल्या जाज्वल्य देवस्थान म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या श्री तिर्थ क्षेत्र महादेव मंदीर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी झाली होती , तर आलेल्या भाविकांसाठी फुलवळ येथील पत्रकार मधुकर डांगे यांनी चहा-पाण्याची ची उत्तम सोय केली होती.
महाशिवरात्री निमित्ताने एक दिवस अगोदरच संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाई ने सजवण्यात आले होते. या मंदीराला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला पण तिर्थक्षेत्रातुन या मंदीरासाठी आत्तापर्यत तरी कसलाच निधी मिळाला नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तासाठी रहाण्यासाठी निवारा नसल्याने त्यांची गैरसोय होत असून येथे भक्तनिवास ची नितांत गरज आहे .
हे महादेव मंदीर सर्वदूर परिचित असल्याने या शिवरात्री च्या महिन्यात दररोज महीनाभर येथे अकरा रूद्राभिषेक व महाप्रसाद , शिवभजन, असे नियमीत कार्यक्रम होत होते , जागृत असलेले महादेव मंदीर हे पंचक्रोशीत प्रसिध्द असुन येथे चैत्र शु.या महीण्यात म्हणजेच आमली बारस निमित्त महादेव मंदीरात गावातील अनेक कुटुंबातील एक व्यक्ती येथे पाचदिवस उपवास करतात व येथेच मुक्कामी राहत असतात. दररोज सकाळ-सायंकाळ दोन वेळा महादेवाचा अभिषेक व रात्रिला किर्तण ,भजन असे धार्मिक कार्यक्रम होत असतात व एकादशीला सायंकाळी महादेवाचे लग्न सोहळा असतो या दिवशी पुर्ण गाव महादेवाचा उपवास करतात व या लग्नसोहळ्यासाठी सपुर्ण गावातील लहान थोरासह व बाहेर गावी असलेले सर्व भाविक अर्वजुन हजेरी लावतात.
महाशिवरात्री निमित्त आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील भविकांसह नांदेड , परभणी, लातुर जिल्ह्यातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती.