कंधार ; कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत आयोजित कृषिवेद कृषीमहोत्सवामध्ये लाठ खु. ता. कंधार येथील प्रगतीशील व आदर्श शेतकरी संतोष प्रभाकर गवारे यांचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावर, डॉ.राम चव्हाण थरमॅक्स कं.,चेअरमन प्रमोद देशमुख, शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार उपस्थित होते.
संतोष गवारे हे मागील 4 वर्षांपासून आधुनिक पद्धतीने संकरीत भाजीपाला बिजोत्पादन करीत आहेत. सिंजंटा, मनसेंटा, महिको आदी कंपन्यासोबत हि शेती करीत असून एकूण 8 शेडनेट मधून झुकेनी, मिरची, टोमॅटो, काकडी आदी भाजीपाला पिकाचे आधुनिक पद्धतीने बिजोत्पादन करीत आहेत. या मधून दरवर्षी लाखो रुपयाचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.
गवारे हे इतर शेतकऱ्यांनाहि प्रेरणा देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत असून, त्यांच्या प्रेरणेने लाठ खु व पंचक्रोशीतील जवळपास 50-60 शेतकरी या भाजीपाला बिजोत्पादनाकडे वळले आहेत.तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संतोष गवारे हे आदर्श झाले आहेत.
पंचक्रोशीत लाठ खु. हे शेडनेट चे गाव म्हणून प्रसिद्ध झाले असून येथील शेतकरी दरवर्षी कोट्यावधीची उलाढाल करीत आहेत. नाबार्ड, कृषीविभाग, कृषी विज्ञान केंद्र, सिंजंटा सह इतर कंपन्या यांचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे आज लाठ खु. हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर आले आहे.
संतोष गवारे यांच्या कार्याची दखल घेऊन सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राने त्यांचा सन्मान केल्याने इतर शेतकऱ्यांनाहि प्रेरणा मिळेल.
*विभागीय आयुक्त सुनील केंद्रे, कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी लाठ खु. येथे भेट देऊन संतोष गवारे सह इतर शेतकऱ्यांच्या बिजोत्पादन शेतीची पाहणी केली*.
*यांचे मिळाले मार्गदर्शन*
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुलकर्णी
*कृषीविज्ञान केंद्र सगरोळी , सिंजंटा, महिको, मनसेंटा कंपन्याचे मार्गदर्शन तसेच कृषी विभाग, नाबार्ड चे अर्थसहाय्य मुळे मला शेडनेट मधून भाजीपाला बिजोत्पादन शेतीकडे वळण्यास प्रेरणा मिळाली. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी माझी शेती पाहावी व अश्या पद्धतीने आधुनिक शेतीकडे वळावे असे आवाहन शेतकरी
संतोष गवारे लाठ खु. यांनी केले .