कंधार ; प्रतिनिधी माधव गोटमवाड
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली.
महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पार पडतात. यावेळी गावातील सर्वच ग्रामस्थ, विविध संस्था सप्ताहाचा नियोजन करतात. आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाच आमंत्रण दिलं जातं. यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात.
मौजे संगमवाडी ता.कंधार येथे अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 44 वे आमच्या येथे वारकरी सेवा भुषण पुरस्कार प्राप्त भजन सम्राट वै.ह.भ.प.प्रेमराव मामा आनंदवाडीकर व वै.ह.भ.प. तुकाराम महाराज तिडके यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा मि.फा.शु.६ शके १९४४ दिनांक २५/०२/२०२३ शनिवार , ते फा.शु.१२ शके १९४४ दिनांक ०४/०३/२०२३ रोज शनिवार ज्ञानरूपी ज्योती प्रज्वलित करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे . तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या गोड व रसाळ ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा.भागवताचार्य श्री. ह.भ.प.सुनिल महाराज ठाकरे सुकळीकर सोबत साथसंगत श्री .ह.भ.प.नवनाथ महाराज, श्री.गणेश महाराज, श्री.शिवा महाराज, श्री.शंकर महाराज सुकळीकर यांचे भागवत होईल तसेच दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत .
पहाटे ४ ते ६ काकडा आरती ,७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,१० ते १२ गाथा भजन , दुपारी १ ते ५ भागवत कथा ,६ ते ७ हरीपाठ ,९ ते ११ हरी किर्तन त्यानंतर १२ ते ४ हरीजागर व शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी ह.भ.प. बंडा महाराज अलगरवाडीकर , रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी ह.भ.प.चैतन्य महाराज निंबोळे नाशिककर (पैठणकर फड), सोमवार २७ डिसेंबर रोजी ह.भ.प.तुकाराम शास्त्री मुंडे , मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी ह.भ.प.सतिश महाराज पंढरपूरकर , बुधवार दिनांक १ मार्च रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे पंढरपूरकर ,गुरूवार दिनांक २ मार्च रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पवार पंढरपूरकर , शुक्रवार दिनांक ३ मार्च रोजी ह.भ.प.पदमाकर महाराज देशमुख अमरावती, यांचे कीर्तन होतील तसेच शनिवार दिनांक ४ मार्च रोजी आठव्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणजेच सप्ताहाची सांगता व
काल्याचे किर्तन सेवा त्याला म्हटले जाते गोपाळ काला व दहीहंडी
फोडून अशी कीर्तन सेवा सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन ह.भ.प.वैराग्यमुर्ती प्रभाकर महाराज झोलकर (नाना) यांचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल
अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने गावात आठ दिवस भक्तिमय वातावरण असणार असुन या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्याला असे आवाहन संगमवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.