लोहा; प्रतिनिधी/
शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या संकल्पनेतून कंधार शहरानंतर लोहा शहरातील आमदार शामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ॲक्यूप्रेशर नैसर्गिक चिकित्सा साप्ताहिक उपचार शिबिराला काल शुक्रवार दि. 24 फेब्रु रोजी उत्साहात प्रारंभ झाला आहे, हे आरोग्य सप्ताह शिबिर लोहा येथे 24 फेब्रुवारी ते दि.01 मार्च पर्यंत रुग्णांच्या सेवेत सुरू राहणार आहे,
या ॲक्यूप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबिरात लकवा मारणे, गुडघेदुखी, मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी ,अर्ध डोकेदुखी, फोजर शोल्डर, स्लिप डिस्क , सपाडिलायझेशन, पोटाचे विकार, गॅस ,ऍसिडिटी, कब्ज, वजन कमी करणे, लघवीचा त्रास, सांधेदुखी, मणक्याची नस धरणे, थायरॉईड, हातापायांना मुंग्या येणे, बीपी, उच्च रक्तदाब, शुगर, मधुमेह या आजारावर ऐकू प्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे जोधपुर राजस्थान येथील तज्ञ डॉ. जितेंद्र सिंह व प्रमोद कुमार , चंदा शर्मा हे तज्ञ डॉक्टर रुग्णावर साप्ताहिक उपचार व मार्गदर्शन करणार आहेत, काल प्रारंभ झालेल्या या ॲक्यूप्रेशर नैसर्गिक आरोग्य शिबिरात प्रथम दिवशी 110 रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आहेत, या एक्यूप्रेशर नैसर्गिक साप्ताहिक आरोग्य शिबिराचा लोहा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त जनतेनी व रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन शेकाप प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केले आहे.