मुंबई (प्रतिनिधी) मरोळ नाका या ठिकाणी माता रमाबाई चौक स्थित असून BEST च्या थांब्यावर व त्या ठिकाण तथा गुगल मॅप वर माता रमाबाई आंबेडकर चौक असे नाव नमूद आहे. मात्र मेट्रो ने या स्थानकाला मरोळ नाका एवढेच नाव नमूद केले आहे. यावर RPI संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी आक्षेप नोंदवला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावं शिंदे यांना दिलेल्या ई निवेदनात असे नमूदिले आहे की,
सदरची चुक कदाचित अनपेक्षित पणे झाली असेल म्हणून सुधारणा करण्याचे आपल्या नजरेत आणून देत आहोत. सदरच्या नावाची सुधारणा लवकरात लवकर करण्यात यावी.
1 महिन्या पर्यंत म्हणजे दि 10/04/2023 पर्यंत मेट्रो ने आपल्या स्थानकाच्या नावात बदल घडवून नाही आणल्यास, मेट्रो ने जाणीवपूर्वक जातीवादातुन हेतूपुरस्कर पणे “माता रामाबाई आंबेडकर चौक” असा नामोउल्लेख केला नसल्याचे समजून मेट्रोचा जाहीर निषेध करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.
निवेदनावर राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर, सर्वोच्च न्यायलयाचे सुप्रसिद्ध विधिज्ञ् व पक्षाचे पदाधिकारी नितीन माने
महिला समाजिक कार्यकर्त्या
सौ. एम. रानीताई वाघमारे
बंजारा सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण अल्पसंख्यांक सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अतिकूर रहमान चौधरी, मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेश गायकवाड, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सौ. नितु वाढणेकर यांची नावे आहेत.