बाप हा बापच असतो. धुळे परिसरात राहणाऱ्या एकोणवीस ( १९ वर्ष ) वर्षाच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या मुलीला करोनाची लागण झाल्याचे कळताच बापाच्या पोटात गोळा आला. धस्स झाले.* *मुलीचा स्वॅब घेतल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलीच्या सर्व कुटुंबास हाय रिस्क असल्याने क्वारंटाईन केलं.
मुलीला उपचारासाठी हिरे रूग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मुलीचे काय होईल या काळजीने बापाची झोप उडाली. रात्ररात्रभर जागून काढल्या. जेवणावरची इच्छा निघून गेली. जगण्यापुरतं जेवण बाप घेत होता. मुलगीही बापाची दुसरी आईच असते. पण बाप मुलीची आई होऊन अस्वस्थ झाला होता.*
*मुलगी एकटी करोना सेंटरमध्ये राहणार म्हणून अस्वस्थ झाली. डॉ पुंड यांनी तिला धीर दिला. रोज घरून गरम जेवणाचा डबा आणून द्यायला व काय हवं नको ते विचारून मुलीचा आत्मविश्वास वाढविला. बापाप्रमाणे मुलीची काळजी घेतली. मायेचा आधार दिला.*
*डॉ.पुंड यांनी व त्यांच्या सर्व स्टाफने दिवसरात्र सेवा देऊन केलेल्या अथक उपचारामुळे मुलगीचा करोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. क्वारंटाईन संपलेल्या बापाला ही बातमी कळली तेव्हा फक्त हर्षवायू व्हायचा राहिला होता. अत्यानंदाने बापाने दहा लाख रूपयांचा चेक डॉ.सुनील पुंड यांना दिला व म्हणाले, “तुम्ही देवदूत आहात. मृत्यूच्या दाढेतून तुम्ही तिला बरे केले आहे. दहा लाख ही रक्कम मुलीच्या जीवाची किंमत नसली तरी मी एवढेच देऊ शकतो.”*
*डॉ.सुनील पुंड म्हणाले, “मला तुमचे पैसे नकोत. शासकीय सेवेत समाधान खूप मोठे असते. तुमची मुलगी माझ्या मुलगीसारखी समजून मी तिची काळजी घेतली. यातच माझं समाधान आहे. मी माझ्याच मुलीला आजार मुक्त केले आहे.”*
*बापाने तुम्हाला सर्व राहू देत. पाहिजे तेवढे घ्या, म्हणून पाया पडू लागले. तुमचे ऋण मला फेडू द्या अशी विनवणी करू लागले.* *डॉ पुंड म्हणाले, “मी माझ्या पेशाला ईश्वरसेवा समजतो. पेशाशी इमान राखणारा मी डॉक्टर आहे. तुम्ही चेक घेऊन जा. मला द्यायचेच असेल तर तुमचे आशीर्वाद द्या.”*
*पेशन्टचा मृत्यू झाला तरी बिल मिळाल्याशिवाय पार्थिव न सोडणारेही आहेत. मास्क, सॅनिटायझर ,पीपीई कीट यातही कमिशन काढणारे आहेत.* *सरकारी अधिकारी पगार व मानाचे पद असताना मेलेल्या माणसांच्या डोक्यावरील लोणी खाणारे आहेत. लाचेची मागणी करून सर्वसामान्यांचे लचके तोडणारेही असताना डॉ.पुंड तुम्ही कोणत्या जगात वावरता समजत नाही?*
*डॉक्टर सुनीलसर , दहा लाख म्हणजे थोडी रक्कम नव्हती. बायकोचा दागिण्यांनी गळा भरला असता. मुलाला व मुलीला मस्तपैकी बाईक घेता आल्या असत्या. घरातील फर्निचर बदलता आले असते. डॉक्टर तुम्ही आलेली संधी दवडली. आपणासारखा ‘वेडा’ माणूस मी बघितला नाही. डॉ.तुम्ही निस्पृहतेता महामेरू आहात.*
*डॉ पुंडसर तुम्हाला साष्टांग नमस्कार. महाराष्ट्र राज्याचा वैद्यकीय विभागास नेहमीच अभिमान वाटेल. मुलीचा बाप काय असतो ? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा बाप आहे. मुलीला करोनातून मुक्त केले म्हणून कोणी दहा लाख देतं का? बाप सुद्धा ‘ वेडाच’ असला पाहिजे. बापाच्या भाऊकतेला, मुलीबद्दलच्या प्रेमाला सलाम.*
*डॉक्टर व मुलीचा बाप दोघेही महान भारताचे महान नागरिक आहेत*
संपत गायकवाड