सातारा-(प्रतिनिधी)
हॉकी खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे अौचित्य साधून संपुर्ण देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो..
सातारा येथील प्रसिद्ध छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री.युवराजजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा येथील नामवंत क्रीडापटू व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मा.श्री.विश्वतेज मोहिते,मा.सौ.माया मोहिते,मा.श्री.सुजीत शेडगे आणि मा.श्री.आदित्य अहिरे यांच्या हस्ते व सातारा जिल्हा व अॅथल्याटिक्स मार्गदर्शक मा.श्री.कालिदास गुजर सर आणि कोल्हापुर विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर.वाय. जाधव,सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे व सातारा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.यशवंत गायकवाड,सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे आणि सातारा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव मा.श्री.राजेंद्र माने, सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री.कल्याण शिंदे,क्रीडाप्रेमी मोहन पवार आणि सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी मा.श्री.अतनुर साहेब आणि मा.श्री.कोळी साहेब तसेच क्रीडा कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती होती…
प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री.युवराजजी नाईक साहेब यांनी प्रास्ताविक केले तर विश्वतेज मोहिते,माया मोहिते आणि श्री.यशवंत गायकवाड यांनी राष्टीय क्रीडा दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली…
राजेंद्र माने यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर कोळी साहेब यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली…