लोहा : विनोद महाबळे
लोहा- कंधारचे शिवसेनेचे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
राज्यात व देशात गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे.
राज्यात व संपूर्ण देशात 22 मार्च पासून काही दिवस महिने जनता कर्फ्यु ,लॉकडाऊन ,संचारबंदी शासनाच्या वतीने कोरोनाला टाळण्यासाठी व कोरोनाला टाळण्यासाठी लावण्यात आली होती.
यावेळी हातावर पोट असलेले रोजमजुरी वाले कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली तेव्हा शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याप्रमाणे अडल्यानडल्या च्या मदतीला नेहमी धावून जाणारी शिवसेना लोहा – कंधार मध्ये बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली धावून आली अनेक नागरिकांना, पालावरील भटक्या समाज बांधवांना बाळासाहेब पाटील कराळे यांच्या वतीने मोफत धान्य वाटप करण्यात आले.अनेकांना मास्क व सॅनीटाझर चे वाटप करण्यात आले.
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहयात बाळासाहेब पाटील कराळे यांनी मोठे रक्तदान शिबिर घेऊन शेकडो रक्ताच्या पिशव्या रक्तपेढी कडे जमा केल्या.तसेच अनेक गोरगरीब नागरिकांचे, शेतकरी शेतमजूराचे कामे करणे त्यांच्या मदतीला धावून जाणे त्यांचे प्रश्न सोडवणे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर सोडविताना मुंबई येथे माळेगाव येथील जनतेच्या कामानिमित्त बाळासाहेब पाटील गेले असता त्यांना नकळत कोरोना ची बाधा झाली आहे.
बाळासाहेब पाटील कराळे यांच्यावर नांदेड येथील आशा रुग्णालयात उपचार चालू आहेत त्यांची तब्येत ठणठणीत आहे बाळासाहेब पाटील कराळे हे लवकरच कोरोणावर मात करतील व लोहा -कंधार ज्या जनतेच्या सेवेत रुजू होतील शिवसेनेचे कार्य पुढे नेतील असा विश्वास लोहा -कंधार मतदार संघातील जनता व्यक्त करीत असून अनेकजण ईश्र्वराकडे प्रार्थना करीत आहेत शिवसेना कार्यकर्ते बाळासाहेब पाटील कराळे बरे व्हावे म्हणून जगदंबेला साकडे घालीत आहेत. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी दिली.