कोरोन संकट काळात मदतीचा हात देणार्‍यांचा कंधार येथे सत्कार;कंधार तालुका ब्राम्हण महासंघाचा पुढाकार

कंधार ; मिर्झा जमिर बेग

कोरोनाला थोपविण्यासाठी मागील 5 महिन्यांपासून लॉकडाऊन देशात करण्यात आला आहे, मात्र या काळात ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

परिणामी अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक व्यक्ती समोर आल्या आहेत. मदतीचा हात देणार्‍या या व्यक्तींना या संकटकाळात मदतीचा हात दिल्याप्रकरणी

कंधार तालुका ब्राम्हण महासंघ व कै. नरहरराव गाजरे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘‘आभार’’ या कार्यक्रमाच्या माध्यमातुन गरजुंना मदत करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

रविवार 30 ऑगस्ट रोजी ह.भ.प शंकर महाराज मठ संस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यी सौरभ अजय परळकर, प्राची व्यास, मानस व्यास, साहील दिग्रसकर, रुतुजा धोंड, क्षितीजा धोंड, मयुर पाठक आदी विद्यार्थ्यांचा ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


जागतीक महामारी असलेल्या कोरोनामुळे संपूर्ण जग हे अर्थसंकटात सापडले आहे. अनेक गरजूंवर उपासमारीची वेळ आल्याने कंधार शहरातील नागरीकांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आभार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड सुनील कोळनूरकर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. अभिजीत जोशी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश देशपांडे व आभार मनोज गाजरे यांनी मानले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल खोडसकर,बाळासाहेब भोसीकर, गजानन महाराज, ॲड. अनिरुद्ध पुराणिक, अजित महाराज, गजानन पाठक, आदी. परिक्षम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *