लोहा येथे आशाताई शिंदे यांच्या हस्ते नाफेडच्या हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

 

लोहा प्रतिनिधी;

लोहा शहरातील शनिमंदिर लातूर रोड पवार कॉम्प्लेक्स मध्ये लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड लोहा यांच्या वतीने नाफेड अंतर्गत हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला, यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, खरेदी विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, उपसभापती श्याम अण्णा पवार, संदीप पाटील उमरेकर, गंगाधर सूर्यवंशी सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती, यावेळी खरेदी विक्री संघाच्या वतीने आशाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नाने लोहा कंधार मतदारसंघामध्ये नाफेड अंतर्गत हमीभाव हरभरा खरेदी केंद्राची सर्वप्रथम सुरुवात लोहा कंधार मतदारसंघात करण्यात आली , मतदारसंघातील शेतकऱ्यांना या नाफेड अंतर्गत हमीभाव हरभरा खरेदी केंद्राची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा या नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा हरभरा बाजारभावापेक्षा जास्तीचा दराने खरेदी केला जाणार असल्याने या खरेदी केंद्राचा आर्थिक फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन या खरेदी केंद्रातून शेतकऱ्यांचा एक क्विंटल हरभरा या खरेदी केंद्रात 5330 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जाणार असल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांनी या नाफेड हमीभाव खरेदी केंद्रामध्ये हरभरा देऊन आर्थिक फायदा करून घेण्याचे आवाहन यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना केले यावेळी संचालक अनिकेत जोमेगावकर, सुधाकर सातपुते, दिगंबर सोनवणे, शरद जोशी, भीमराव शिंदे, पत्रकार ज्ञानोबा पवार, माजी सरपंच गोविंदराव चिंचोलीकर, सचिन कुदळकर, संतोष मुकणर, सिद्धू वडजे, चेतन पवार, सरपंच केशव इंगळे, भाऊराव कंधारे,प्रसाद जाधव सह शेतकरी बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *