बारुळ यात्रेत कुस्त्या ऐवजी रंगला राजकारणाचा फड … परजिल्हातील पैलवानांची झाली निराशा …! कुस्त्या न झाल्याने गावकर्‍याने केला निषेध

बारुळ ; विशेष प्रतिनिधी

बारुळ येथील प्रसिध्द असलेली महादेव याञा दरवषीॅ पंरपराची जञा भरलेली होती यावेळी कुस्ताच्या दंगल नियोजीत कार्यक्रम नुसार जिल्हातील व बाहेर जिल्हातील अालेले असतानाही संस्थानचे कुस्ताच्या दंगलित एकही सद्स हजर झाले नसल्याने गावातील,तालुक्यातील प्रेशकासह जिल्हातील व परजिल्हातील पैलवान वाट पाहुन निराशहुन गेले .

यामुळे शेकडो वषीॅची पंरपरा मोडल्यामुळे गावातील नागरिक संतप्त होऊन संस्थानच्या नावाने निषेध करुन घरी शांतेत परत गेले .

बारुळ येथील जागृत देवस्थान महादेव ची याञा दरवर्षी असते कोरोना चा काळ वगळता नित्य नियमाने दरवर्षी काठीची पूजा विविध सांस्कृतिक कार्यक्रम लावणी कुस्त्या क्रिकेट असे कार्यक्रम यात्रेनिमित्त घेण्यात येतात येथील मानकरी व संस्थांच्या मंडळ सोबत मागील वर्षापासून मानकरीच्या सततच्या वाद विवाद भाविकाच्या भावनेविषयीचा आपल्या मर्जीप्रमाणे मंडळाची दबंग शाही शेकडो वर्षाची परंपरा मोडीत काढणे युवकांचे क्रिकेटचे सामने सहकार्याने न करणे याचा परिणाम यंदाच्या यात्रेत दिसून आला यामुळे संस्थांच्या मंडळातील व गावातील बाहेरगावी भावीकासोबत वादविवाद होणे यामुळे यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला याचे पडसाद पाच एप्रिल यात्रेच्या कार्यक्रम पत्रिका नियमाप्रमाणे कुस्तीची भव्य दंगल होती

येथील मानकर यांनी गावातील नागरिकासह कुस्त्यांच्या फडामधे वाजत गाजत कुस्त्याचा मैदानात दाखल होऊन नारळ फोडले यावेळी उस्मान नगरचे पोलीस बिट जमदार एस वाय मुंडे शिवपूजे पोलीस पाटील संजय जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

परंतु सायंकाळ झाले होते मैदान हजारो प्रेक्षकांनी भरभच्च भरलेले होते जिल्ह्यातील व परभणी लातूर यवतमाळ या पर जिल्ह्यातील ही कुस्तीपटू महिला व पुरुष दाखल झाले होते कुस्त्याचा रंग चांगलाच यंदा रंगणार यासाठी सर्वांची बघण्याची आवड निर्माण होते परंतु या महादेव मंदिर संस्थांच्या मंडळातील एकही सदस्य या मैदानात दाखल झाला नाही त्यामुळे कुस्ती कधी चालू होणार या प्रतीक्षेत होते दुपारपासून सायंकाळी सहा वाजले तरी कुस्त्यां न चालू झाल्यामुळे गावातील नागरिकाचा राग अनावर न झाला मुळे गोंधळ निर्माण झाला व संस्थांच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने नागरिकांना शांतता आव्हान करून अखेर निराश होऊन गावातील नागरिक भाविक प्रेषक व जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील कुस्तीपटू निराश होऊन निघून गेले

 

* बारूळ येथील प्रसिद्ध असलेल्या महादेव यात्रेच्या निमित्त कुस्त्यांची भव्य दंगल कार्यक्रम पत्रिकेनुसार आम्ही पाहून शंभर किलोमीटर हुन मी कुस्तीसाठी आलो होतो परंतु इथे माझ्यासह इतर कुस्तीपटूंना आल्या तसे परत जावे लागले
मोनिका गंगाखेडकर
महिला कुस्तीपटू

 

* महादेव यात्रे कुस्त्यासाठी बारूळ येथे आलो होतो परंतु दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत वाट पाहून कुस्त्याचे डाव रगले नाही आम्हालाही आल्या तसे येथील हजारो प्रेक्षक व उपस्थित माझ्यासह जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील कुस्तीपटूंना निराश होऊन स्वखर्चाचा भुर्दंड झाला यात्रे कमिटीला कुस्त्या ठेवायच्या नव्हत्या तर कार्यक्रम पत्रिका मध्ये कशाला नाव टाकले
गोरख चावरे अहमदपुर
कुस्तीपटु

 

 

–*———

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *