फुलवळ (धोंडीबा बोरगावे)
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे एक अनोखा विषय असा आहे की जुनेगावठाण येथे एकाच मंदिरात दोन तर नवीन गावठाणात एका मंदिरात एक असे हनुमानाचे मंदिर दोन आणी त्यात एकूण तीन मुर्ती आहेत हे विशेष..
दरवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावातील या दोन्ही मंदिरातील हनुमान च्या तीन ही मुर्तीचा गावक-यांकडून भल्या पहाटे सामुदायिक अभिषेक केला जातो. आणी सायंकाळी संपूर्ण गावाला चुलबंद महाप्रसादाचे आयोजनही ग्रामस्थांच्या वतीने संपुर्ण गावक-यांसाठी केले जाते , तसेच यावर्षी ही करण्यात आले .
फुलवळ मध्ये जुने गावठाण व नविन गावठाण अशा दोन वस्त्या असुन या दोन वस्ती मधुन एक नदी पात्र वाहते , जुनेगावठाण मध्ये अनेक वर्षापुर्वीचे जुने हनुमान मंदिर असुन याच मंदिरात हनुमानाच्या दोन मुर्त्या आहेत. तर नविन गावठाणात कांही वर्षापुर्वी नव्याने हनुमान मंदिर उभारण्यात आले. त्यात एक हनुमानाच्या मुर्ती ची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
तेंव्हा पासुन या दोन्ही मंदिरातील हनुमान मुर्ती ची पुजाअर्चा गावकरी करत असतात. एवढेच नाही तर दरवर्षी या दोन मंदिरा भोवती त्या त्या भागातील शेतकरी आपापले बैल बैलपोळ्याला फिरवून बैलपोळा सण साजरा करतात.
होळी हा सण सुध्दा या दोन ठिकाणी साजरा केला जातो. त्यामुळे सर्वत्र फुलवळ गावच्या या दोन मंदिर आणी तीन मुर्ती ची पूजाअर्चा करण्याची उत्सुकता सर्वांनाच मनातून जोरदार असते.
गावात मंदिर जरी दोन असले तरीही हनुमान जन्मोत्सवानिमित्त मात्र भंडारा हा एकाच ठिकाणी म्हणजे जुनेगावठाण येथील मंदिराच्या परिसरात होत असतो. यातुनच गावकरी ऐक्याचा सलोखा जपत व घडवत असतात आणि इतरांसमोर आदर्श ठेवतात तेच नवीन पिढीला ते अंगिकरण्याचे बळ देतात हे विशेष..
हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित भंडाऱ्यात गोड खीर , हुलपली चा महाप्रसाद घ्यायला गावातील सर्व महिला , पुरुष , लहानथोर , अगत्याने हजर राहतात. हे गावातील भक्तीभावाचे दर्शन घडवणारा प्रसंग असल्याचे दिसुन येते.
__________