शेकापुर येथिल हरिनाम सप्ताहची.श्री ह.भ.प.महंत गुरुवर्य एकनाथ नामदेव महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

 

कंधार (एस.पी.केंद्रे )

कंधार तालुक्यातील शेकापुर येथील दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भव्य बारशी यात्रा महोत्सव कै. रामचंद्र पाटील केंद्रे यांच्या शेतातील श्री शंभू महादेव यांच्या भव्य यात्रेला गुरूवार दि. ३० मार्च पासून प्रारंभ झाला होता. या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल, कावडीचा कार्यक्रम ,कळस स्थापना व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमच शेकापूर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन संत नामदेव महाराज संस्थानचे मताधिपती एकनाथ नामदेव महाराज यांच्या कृपेने व भजन शिरोमणी वारकरी भूषण श्री प्रेमराज महाराज आनंदवाडीकर यांनी तयार केलेल्या गुनिजन भजनी मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेकापुर येथील कै. रामचंद्र पाटील केंद्रे यांच्या शेतातील जागृत महादेव मंदिर असून सर्व पंचक्रोशित नवसाला पावणारा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानास नांदेड, जिल्ह्यातील मोठा भाविक वर्ग दर्शनासाठी येत असतो.
दि.६ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. कळसाची मिरवणूक ,सकाळी ८ ते ११ कळस पुजा होमहवन व काल्याचे किर्तन श्री ह.भ.प. महंत गुरुवर्य एकनाथ नामदेव महाराज उम्रजकर यांच्या हस्ते कळस स्थापना व काल्याचे किर्तन संपन्न झाले .
काल्याच्या कीर्तनामध्ये महाराजांनी मार्गदर्शन करत असताना समस्त ग्रामस्थांना आपल्या जीवनामध्ये सुख शांती हवी असेल तर अध्यात्माची कास धरा असा मोलाचा संदेश महाराजांनी आपल्या कीर्तनातून देऊन व असाच अखंड हरिनाम सप्ताह पुढे मोठ्या आवडीने करावा असं गावकऱ्यांना आवाहन केले अध्यात्मामुळे माणूस सुसंस्कृत व व्यसनमुक्त व्यसनापासून दूर राहून आपला संसार व परमार्थ सुखाचा होऊ शकतो त्यामुळे अध्यात्माचे सर्वांनी पालन करावं असंही आव्हान महाराजांनी या कीर्तनातून समस्त ग्रामस्थांना केले.
महाराज आपल्या कीर्तनात पुढे बोलत असताना संत नामदेव महाराज संस्थान उंब्रज व शेकापूर वासियांचे असलेले जुने संबंध यावरती बोलत असताना महाराजांनी संत नामदेव महाराज तेलंगणा राज्यातून येत असताना शेकापूर मुक्कामी राहत होते असाही जुनी आठवण महाराजांनी शेकापूर वाशीयांना करून दिले व संत नामदेव महाराजांच्या हस्ते बजरंग बली हनुमंतरायांना पनीर खाऊ घातला अशी आख्यायिका असल्याचे ग्रामस्थांना सांगितले .
महाराज पुढे बोलत असताना आपल्या अंतकरणांमध्ये असलेल्या विकाराच्या गाठी नाहीशा करून आपलं चित्त निर्मळ केल्यानंतर आपल्या अंतकरणांमध्ये भगवान परमात्म्याचा वास होतो असेही सांगितले व आपल्या अंतकरणांमध्ये अहंकार गर्व मी पणा हे सोडून देऊन प्रत्येकाने एकमेकाबद्दल बोलत असताना सर्वांनी प्रेमाने व आदराने वागावे असे गावकऱ्यांना सांगितले सर्व जणतेनी कुठलाही भेदभाव न करता एक मेकाच्या सहकार्याने राहावे असेही महाराजांनी सर्व गावकऱ्यांना आवाहन केले. शेकापूर येथील सर्व मुलींना तथा बायलेकींना ओटी व शंभू महादेवाची पिंड देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मृदंगाचार्य म्हणून तालमणी नामदेव महाराज केंद्रे विशाल म. बाबुळगावकर माऊली महाराज तिडके व गायनाचार्य म्हणून स्वर रत्न गोपीनाथ महाराज केंद्रे विष्णु महाराज तांदळीकर राहुल नावलगावकर प्राध्यापक राजेंद्र महाराज घुगे कैलास महाराज मुरकुटे वैजनाथ महाराज तिडके व पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले
यात्रा कमिटी व समस्त गावकरी मंडळींच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *