कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसिकर यांच्या आदेशानुसार आज दि:-१०/०४/२३ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी येणाऱ्या/संभाव्य कोविड-१९ महामारी साथीची तयारी म्हणून कंधार ग्रामीण रुग्णालयात पि. एस. ए.ऑक्सिजन प्लांटची पाहणी करून त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि प्युअर ऑक्सिजन तयार आहे किंवा नाही याची पाहणी करण्यात आली आणि रुग्णालयातील वॉर्ड मध्ये जाऊन ऑक्सिजन पुरवठा ई.चि पाहणी केली आहे. तसेच येणाऱ्या कोविड-१९ साथीच्या महामारीला आळा घालण्यासाठी पुरेसा औषधी साठा उपलब्ध आहे.. आणि त्यासाठी स्पेशल वैद्यकीय अधिकारी (फिवर क्लिनिक)यांची नेमणूक करण्यात आली आहे.जेने करून येणाऱ्या साथीच्या महामारी चा सामना करू शकतो .करिता जनतेने, न घाबरता.. खोकला, ताप ,सर्दी ,घसा खवखवणे,अंग दुखी असे लक्षणे आढळल्यास ग्रामीण रुग्णालयात यावे व आपली कोविड ची तपासणी करून घ्यावी असे आहवान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले,डॉ. संतोष पदमवार ,कर्मचारी शितल कदम,शिल्पा केळकर,योगेश्वरी कबीर,प्रशांत कुमठेकर, विष्णुकुमार केंद्रे आदीची यावेळी उपस्थिती होती .