पेशवाईचं काळ असा होता की दलित समाजाला दिवसातील विशिष्ट वेळी रस्त्याने चालण्यास परवानगी होती. सकाळी संध्याकाळी तर त्यांना फिरण्यास बंदीच होती. त्या समाजातील माणसांच्या सावलीने सर्व सवर्ण हिंदू बाटत होते. त्यांना रस्त्यावर थुंकता येत नव्हते. रस्त्यावर थुंकू नये म्हणून गळ्यात मडके बांधले जाई. रस्त्याने पावलाचे ठसे उमठू नये म्हणून पायाला झाडू बांधला जाई. अशा एक ना अनेक अन्याय या समाजवर होत होते. यांचा वाली त्या काळी कोणीच नव्हता. हा समाज अन्याय सहन करत जगत होता. पण शेवटी या समाजाचा उद्धारक जन्माला आला तो दिवस होता १४ एप्रिल १८९१ मध्यप्रदेशातील महू हे गाव. आईबापाच्या पोटी चौदावे रत्न म्हणून .
महामानव जन्माला आले आणि दलिताचे कल्याण झाले. थोडं का होईना जीवन सुसह्य बनलं. बाबासाहेब १९२२मध्ये वकीलाची पदवी पूर्ण करून समाजकार्य सुरु केले. गोरगरिब दलित यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी १९२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात नाव नोंदविले. पण येथेही त्यांना स्पृश्य समाजाचे लोक सहकार्य करत नसत. स्पर्श लोकांच्या केस बाबासाहेबाकडे देत नसत. येथे स्पर्श समाजाचे कृष्ण गणेश मोडक नावाचे एक वकील त्यांना सहकार्य करत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली केस लढविली ती अस्पृश्य समाजातील नासिक जिल्हयातीत महारजातीच्या जाधव बंधूची. त्यांनी ती केस लढवली व जिंकली ही. “देशाचे दुष्मण ” हे पुस्तक लिहिणारे केशव गणेश बागडे , केशवराव मारुती जेधे , रामचंद्र नारायण लाड व दिनकर शंकरराव जवळकर यांना खालच्या कोर्टाने दोषी ठरविले होते पण डॉ. बाबासाहेबांनी त्यांची केस वरच्या कोर्टात नेवून त्यांना निर्दोष सोडविले. बाबासाहेब ब्राम्हणेतर सत्यशोक चकवळीत काम त्यावेळी करत होते .
या महामानवाने अस्पृश्यता व जाती अंताचा लढा जीवनाच्या अखेरपर्यंत लढत राहिले. यांनी वर्ग लढ्याला , जाती अंताच्या लढयाला आकार देण्याचे , दिशा देण्याचे भरीव कार्य केले . बाबासाहेबांनी केलेले हे कार्य जागतिक पातळीवर प्रेरणादायी ठरलेले आहे . जाती अंतासाठी , समतेसाठी , मानव काल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी जगात कार्य केलेले आहे , त्यात महामनाव बाबासाहेब सर्वांत उच्च स्थळी विराजमान आहेत. बाबासाहेबांनी वर्ग ,जात, धर्म , लिंग , वंश यात भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान आधिकार मिळाले पाहिजेत समाजातील विषमतेची दरी मिटली पाहिजे यासाठी त्यांनी तीन मार्ग सूचविले होते. ते तीन मार्ग म्हणजे बेटी व्यवहार (अंतरजातीय विवाह ) , रोटी व्यवहार (स्पृश्य अस्पृश्य एकमेकांच्या घरी खानपान करणे)आणि संस्कृतिक मिलाप ( सर्व प्रकारच्या कार्यक्रमात स्पृश्य अस्पृश्य एकत्र येवून साजरा करणे ) पण यात स्पृश्य समाजाने साथ दिली नाही .
डॉ बाबासाहेबांना लहानपणापासूनच जातीयतेचे चटके सहन करावे लागले याचे वर्णन त्यांनी “वेटींग फॉर अ विझा” १९३५-३६ या काळात त्यांनी लिहिल्या आत्मचरित्रात त्यांच्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. इंग्रजी सत्ता असताना राजकीय स्वातंत्र्य आगोदर की समाज सुधारणा आगोदर हा वाद लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यात चालू होता. बाबासाहेब या वादापासून दूर होते . बाबासाहेब विचार करत की भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्याला किंमत काय? . बाबासाहेबांना सामाजिक सुधारणेबरोबर अस्पृश्यता निर्मुलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे वाटत होते. बाबासाहेब इंग्रज सत्तेचे कट्टर विरोधक होते. इंग्रजी राजवटीतही १९१९ पर्यंत दलितांना राजकीय व सामाजिक हक्क मिळाले नव्हते. साऊथबॅरो कमिटी ( १९१९ ) मुंबई प्रांतात आली तेव्हा डॉ .बाबासाहेब हे अस्पृशांचे प्रतिधिनी म्हणून हजर राहीले. त्यांनी त्या कमिटी समोर पन्नास पानांचे निवेदनही सादर केले होते. त्यात त्यांनी अस्पृशांना मतदानाचा ह्क्क, निडनुकीत उभे राहण्याचा हक्क , स्वतंत्र मतदारसंघ , अस्पृश्य यांनी अस्पृश्य प्रतिनिधीची निवड, लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधी संख्या , या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. या मागण्या मान्य करावेत म्हणून देशात वेगवेगळ्या भागातील अस्पृश्य लोकांनी सभा घेवून ठराव पास केले. ते ठराव सरकारकडे पाठवू लागले. या बाबतीत लोकांनी चळवळच सुरु केली होती.
ही चळवळ सुरु राहावी . याची गांभीर्याने दखल घेतली जावी म्हणून बाबासाहेबांनी ”मुकनायक ” हे पाक्षिक सुरु केले . यातून त्यांनी दिलतावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.
बाबासाहेबांच्या कार्यामुळे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज प्रभावित होवून त्यांनी मुंबईत बाबासाहेबांच्या घरी स्वतः बाबासाहेबांना भेटले. बाबासाहेबांना वर्तमानपत्र काढण्यासाठी आडीच हजार रूपयांची मदत केली . मुकनायकचे पहिले संपादक म्हणुन पांडूरंग नंदराम भटकर यांनी काम केले. १९२९ ला मूकनायकचा पहिला अंक निघाला. त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ मनोगत ‘ हा अग्रलेख लिहून त्यातून अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली .
घार फिरते आकाशी चित्त तिचे पिल्ल्या पाशी.आंबेडकर ही घारी सारखेच होते.आंबेडकर कुठेही असोत त्यांच्या ध्यानीमनी समाज व समाजाच्या समस्या समोर असायच्या.१९२० मध्ये जेव्हा ते इंग्लंडला शिकायला गेले तेव्हा त्यांनी तत्कालीन भारत मंत्री मॉटेग्यू याची भेट घेवून अस्पृशाचे प्रश्न मांडले होते . हळूहळू बाबासाहेबांचे अनुयायी वाढत होते. हक्काच्या मागण्यासाठी , अन्यायाच्या विरोधात आंदोलने सुरु झाले होते . यासाठी माणगाव कोल्हापूर व नागपूर येथे अस्पृशाचा दोन सभाही घेण्यात आल्या ( १९२०) या दोन्ही परिषदेत डॉ बाबासाहेब हजर होते. त्यांच्याबरोबर छत्रपती शाहू महाराजही हजर होते. या सभेत आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या कल्यांनासाठी सामाजिक व राजकीय हक्काचे समर्थन केले.तर छत्रपती म्हणाले, ” आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचे उध्दार करतील. आपल्या भारत देशाचा उद्धार करतील. आंबेडकर हे फक्त अस्पृशाचे नव्हे तर देशाचे थोर नेते होतील. समाजाने आपला उद्धार करून घ्यावा. ”
नागपूर येथील सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजसेवक वि रा शिंदे यांच्या विरोधात ठराव पास करुन घेतला .वि रा शिंदे म्हणत की अस्पृशांना स्पृशांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय हक्क मिळावेत. आंबेडकरांना हे मान्य नव्हते .आम्हाला हक्क मिळवण्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नाही.आम्हाला थेट राजकीय व सामाजिक हक्क मिळावेत. असे मत बाबासाहेबांचे होते .
सातारा जिल्ह्रयातील कोरेगाव येथील सभेत बाबासाहेबांनी ब्राम्हणी विचारापासून सावध राहण्यास सांगितले. अस्पृश व मागासवर्गीयासाठी बाबासाहेबांनी ” बहिष्कृत हितकरणी ”सभेची स्थापना १९२४ मध्ये केली. या सभेचे ध्येय व कार्य त्यांनी सूचित केले. ‘ शिका , संघटीत व्हा व संघर्ष करा.’ ही केवळ घोषणा नाही. हे केवळ वाक्य नाही. ते प्रत्यक्ष कार्य करण्याचे वचन होते. हे आज्ञावाचक होते.तळागळातील लोकांना सामाजिक , राजकीयदृष्ट्या बरोबरीत आणने हा उदेश होता. नागरी, धार्मिक , राजकीय हक्काबदल जागृती करणे हा उदेश होता. बाबासाहेबांनी सायमन कमिशनकडे सरकारी नोकरीत अस्पृशांसाठी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मागणी केली होती .बहिष्कृत हितकरणी सभेमार्फत अस्पृशाच्या कल्यांनासाठी शाळा , वसतीगृह , वाचनालय , ग्रंथालय सुरू करण्यात आले होते. या सभेचे एक अधिवेशनही घेण्यात आले होते. या अधिवेशनाच्या वेळी हितकरणी सभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी त्या काळच्या विधिमंडळावर घ्यावे म्हणून मागणी केली व १९२६ मध्ये डॉआंबेडकर व सोलंकी यांना सभासद म्हणून घेण्यात आले.
बाबासाहेबांनी समाजहितासाठी पुणे जिल्यातील कोरेगाव भिमा येथे भेट देवून आपले पूर्वज किती शुर होते. आपण शूर वंशजाचे आहोत हे पटवून दिले व समाज बांधवात नवचैतन्य निर्माण केले होते. बाबासाहेबांना पाण्यासाठी व मंदिर प्रवेशासाठी ही सत्याग्रह करावा लागला . मोर्चे काढावे लागले . अस्पृशांना मंदिरात प्रवेश मिळावे म्हणून लढा द्यावा लागला .डॉ बाबासाहेबांनी दलितासाठी, इतर मागासवर्गीयासाठी केलेल्या कामातून , त्यांच्या शिकवणीतून माणुसकीचे पदोपदी दर्शन घडते .सर्वांनी सन्मानाने जीवन जगावे असा संदेश मिळतो ,बळ मिळते. त्यांनी चालवलेल्या चळवळीतून त्यांना समाजातील भेदाभेद संपवायचे होते. सर्व भारतीय समाज भेद रहित होईल असे त्यांना वाटत होते. समाजातील भेद कमी होईल म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेशजयंतीत ही भाग घेतला होता. आंबेडकरांना अस्पृश्य हिंदू म्हणून तथाकथीत हिंदूनी कधीच समजून घेतले नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्मीयाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनूस्मृतीचे दहन केले .दलित पिडीत समाज आजही मनुस्मृतीला क्रुरतेचे व विषमतेचे प्रतिक समजतो. अस्पृशांवर केलेल्या अन्यायांची जंत्री म्हणजे मनुस्मृती होय असे आजही मागासवर्गीय माणुस समजतो.
महात्मा गांधीच्या ‘हरिजन ‘ या शब्दालाही आंबेडकरांनी विरोध केला. अस्पृश्य हरिजन तर बाकीचे कोण ?असा त्यांच्या सवाल होता. अस्पृशांसाठी त्यांनी अनुसूचित जाती हा शब्द स्विकारला होता.
बाबासाहेब अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आले होते . सवर्ण हिंदू सुधारतील म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.जीवनभर संघर्ष केला यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत . शेवटी पदरी निराशाच पडली. म्हणून शेवटी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचे ठरविले . त्यांनी पक्क ठरविलं जसं भारताला राजकीय स्वातंत्र्य आवश्यक आहे तसं दलितांना धर्म बदलने आवश्यक आहे . हिंदू धर्म हा जातीचा पुरस्कर्ता आहे . या धर्मात समता , स्वातंत्र्य व बंधूता नाही. जो धर्म दलितांना मंदिरात जावू देत नाही . सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू देत नाही, पाणी पिऊ देत नाही. जो धर्म दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवतो. त्यांच्या सावलीचा विटाळ मानतो. धर्मातील व्यक्तीनाच तुच्छ मानतो आशा धर्मात दलितांनी का रहावे ? असे बाबासाहेबांचे विचार होते .
म्हणून त्यांनी १३ आक्टोबर १९३५ रोजी नासिकजवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. ते म्हणाले, ” मीअस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हेत, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही.”
डॉ . बाबासाहेबांनी हिंदू संस्कृतीला धोका व धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही अशा धर्माची निवड त्यांनी स्वतःसाठी व अनुयायासाठी केली. तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय.. त्यांनी जातपात मोडक मंडळात केलेल्या भाषणात म्हणाले होते , ‘ अस्पृश्यांनी बुद्ध वचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल. “
महामानवाचा आज जन्मोत्सव आपण आनंदात साजरा करूया.
राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७ .