#नवी दिल्ली_दि.31 | सर्वोच्च न्यायालय अवमान प्रकरणी दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंडाची शिक्षा सुनावलीय. हा दंड न भरल्यास ३ महिने तुरुंगवास आणि ३ वर्षे प्रॅक्टीसवर बंदी होऊ शकते. गेल्या सुनावणीत प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. भूषण यांना काय शिक्षा द्यायला हवी ? याबद्दल तुम्हीच सांगा असे न्यायालयाने भूषण यांच्या वकीलांना विचारले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण करुन शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. भूषण यांना शिक्षा सुनावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एटॉर्नी जनरल यांचा सल्ला मागितला होता. न्यायिक व्यवस्थेला आपल्यात सुधारणा आणण्याची गरज असल्याचे भूषण यांचे ट्वीट होते. त्यामुळे भूषण यांना माफ करायला हवे असे एटॉर्नी जनरल यांनी सांगितले. भूषण यांच्या मागच्या भूमिकेत सुधार होईल अशी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षा होती पण असे झाले नाही. आम्ही भूषण यांना संधी दिली होती. चूक नेहमी चूक असते आणि संबंधित व्यक्तीला ते जाणवायला हवं असे न्यायालयाने म्हटलं. पण भूषण हे आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यावर प्रशांत भूषण यांची टिप्पणी केली होती. तर दुसऱ्या ट्टिटमध्ये चार न्यायाधिशांवर लोकशाही नष्ट करण्याची भूमिका बजावल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र ट्वीटची स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध अवमान कार्यवाही सुरु केली होती. न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अवमान नोटिसाला उत्तर देताना वकील भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना सांगितले की, सरन्यायाधीशांवर टीका केल्याने सर्वोच्च न्यायालयाचे मोठेपण कमी होत नाही. सर्वोच्च न्यायालयात सर्वसाधारण सुनावणी न झाल्याने अत्यंत खर्चीक दुचाकी चालविणाऱ्या सरन्यायाधीशांविषयी ट्विट करताना टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी मुख्य न्यायाधीशांविषयी केलेल्या ट्वीटमागे आपली स्वतःची विचारसरणी आहे, जी कोणालाही अप्रिय वाटेल पण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान नाही. प्रशांत भूषण यांनी असा युक्तिवाद केला की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील अवमान कार्यवाही रद्द करावी. मात्र, त्यांचा हा युक्तीवाद ग्राह ठरला नाही. ते दोषी ठरले.#PrashantBhushan #SC |