कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे फुलवळ यथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांनी उपस्थित राहुन सर्व प्रथम पंचशिल धव्जारोहन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. व सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत जय भिम अशा घोषणा दिल्या.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ यांच्या वतीने आदरणीय सौ.आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सौ.आशाताई शिंदे यांनी भाषण करीत असताना असे सांगितले की,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलूयुक्त आहे.त्यांनी सतत बहुजन सुखाय,बहूजन हिताय’ या गौतम बुद्धाच्या मुलमंत्राप्रमाणे कार्य केले.
त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कार्य, विचार वंचित, उपेक्षित,दीनदलीत समुहाच्या उध्दाराचे केले आहे.त्यांचा जातिव्यवस्थेवरील हल्ला प्रस्थापित उच्चवर्णीय समाजाविरुद्ध आव्हान देण्यासाठी नसुन दबलेल्या समाजातील जनतेच्या विकासासंबंधी होती.याप्रसंगी माधव दादा जमदाडे (वंचित बहुजन आघाडी मराठवाडा नेते),वर्षाताई भोशीकर मा.जि.प.सदस्या,उत्तम चव्हाण (पंचायत स.कंधार सदस्य),सौ.विमलबाई मंगनाळे सरपंच फुलवळ,शेख शेरु भाई शेकाप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, विक्रम पा.मोरे सरपंच जोशीसांगवी,महेश पिनाटे शेकाप कंधार शहरप्रमुख, अशोक बोधगिरे, गणेश पा.दवळे,नागनाथराव कांबळे, बालाजी देवकांबळे,माऊली मुंडे सरपंच मुंडेवाडी,शंकर डिगोळे सरपंच कंधारेवाडी,गिरीश डिगोळे शेकाप नांदेड दक्षिण अध्यक्ष,जमीर पठाण,के.एच.वने साहेब, भारत भालेराव,या जयंती चे आयोजक व जयंती मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बनसोडे,नागेश गोधने,कोंडीबा मोरे,वसंतराव फुलवळे,गावकरी व भिमबांधव मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.!