नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा नागपूर येथील लोकार्पण सोहळा

 

नागपूर ; जामठा प्रतिनिधी

नागपूर ,जामठा येथे उभारण्यात आलेल्या #नॅशनल_कॅन्सर_इन्स्टिट्यूट चा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.

डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीने या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. २५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात ४७० खाटांची सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवांनी सुसज्ज अशी ही #कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्यातील नागपूर, विदर्भासह #मध्यप्रदेश, #तेलंगणा, #छत्तीसगड या राज्यांतील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठीही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून हे इन्स्टिट्यूट तयार झाले आहे. यावेळी बोलताना त्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या परवडणाऱ्या किंमतीत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, हवामान बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे कर्करुग्ण वाढत असून ही एक मोठी समस्या बनली आहे.

देवेंद्रजींचे वडील आणि माझ्या आईचा मृत्यू कर्करोगामुळे झालेला असल्याने त्या वेदनांची आम्हाला पूर्ण जाण आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी या इन्स्टिट्यूटचा नक्कीच लाभ होईल असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. अशा संस्थेच्या उभारणीचे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले.

अशा अनेक आरोग्य मंदिरांची राज्याला गरज आहे. या आरोग्य मंदिराला राज्यातील लोकप्रतिनिधी भेट देतील आणि इथला सेवाभाव पाहून प्रभावित होऊन आपापल्या भागात अशी आरोग्य मंदिरे उभारतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. येथील डॉक्टर, नर्सेस देवदूताप्रमाणे कार्य करतील असा मला विश्वास आहे. या संस्थाप्रमाणे राज्यातील इतर संस्थांना देखील राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली.

याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ॲड.सुनील मनोहर, माजी खासदार तथा उपाध्यक्ष अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.

#Nagpur #NationalCancerInstitute
Nitin Gadkari Devendra Fadnavis Mohan Bhagwat Rahul Narwekar – राहुल नार्वेकर Chandrashekhar Bawankule

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *