पुस्तकांच्या गाडीतून फेरफटका -कादंबरी : ययाति ,लेखक : वि. स. खांडेकर
वी. स. खांडेकर ह्यांची ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली सुंदर, अप्रतिम अशी ही कादंबरी म्हणजे ययाति! देवयानी, शर्मिष्ठा, ययाति ह्यांच्या स्वभावाच्या तीन बाजू ह्याचा संगम म्हणजे ही अवर्णीय कादंबरी.
ययाति राजा ज्याला कामांध, मोह, भोग स्वप्नात सुद्धा विषय सुख दिसत असा ययाति. जो दिवस रात्र कामांध झालेला राजा. ज्याला दिवसरात्र स्त्री भोग, स्त्री सुख हेच हवं असणारा! आयुष्य म्हणजे फक्त स्त्री भोग बस! असा हा ययाति आणि त्याची बायको म्हणजे देवयानी. राक्षसाचे ऋषी शुक्राचार्य यांची मुलगी. दिसायला सुंदर! पण तितकीच गर्विष्ठ, अविचारी, संतापी, अविवेकी. ययातिच्या कामांध वासनेचा आणि ययातिचा तिरस्कार करणारी. पण कचावर मनोमन प्रेम करणारी. कच हा शुक्राचार्य ह्यांचा शिष्य आणि गुरुची मुलगी देवयानी म्हणजे गुरुभगिनी त्यामुळे तो देवयानीच्या प्रेमाला नकार देतो त्यामुळे देवयानी अधिक चिडखोर होते. शर्मिष्ठा ही देवयानीची मैत्रीण आणि राजा वृष ह्याची मुलगी. शर्मिष्ठा राजकन्या असते. शर्मिष्ठा शांत, सौम्य, सोज्वळ अशी.
ययाति आणि देवयानी यांचं लग्न होतं. लग्नानंतर देवयानी शर्मिष्ठा राजकन्या असुनही तिला दासी म्हणून स्वतः बरोबर आणते. सतत तिची अहवेलना करते. शांत सयंत शर्मिष्ठा देवयानीचा संताप कायम झेलून पण शांत राहते.
ययाति एकदा शर्मिष्ठेला पाहतो आणि त्याच मन तिच्यासाठी आतुर होत. आयुष्यभर लग्न नाही केवळ दासी बनून राहण हे जरी शर्मिष्ठेने मान्य केलं तरी ती ही ययातिवर मनाने प्रेम करायला लागते त्याच्या मनोमन प्रेमात पडते.
शर्मीष्ठेच्या शांत, प्रेमळ सहवासाने ययाति तिच्या प्रेमात आकंठ बुडतो. देवयानीकडून सतत अहवेलना, तसे कुचकट बोल हे सगळं सहन करुन ययातिवर निरपेक्ष प्रेम करणारी शर्मिष्ठा हिच्या प्रेमात ययाति पडतो. तीन व्यक्तीच्या मनोवेदना म्हणजे ययाती कादंबरी.
शर्मिष्ठा रात्री चोरुन ययातिला भेटायला येत असे. अश्याच एका रात्री ती येत नाही. रात्रीचा प्रहर पुढे चालला तरी शर्मिष्ठा भेटायला आली नाही मग तिच्या आठवणीत ययाती व्याकुळ होतो. प्रेयसीची ओढ आपली व्यथा तो चंद्र चांदण्यांना सांगतो. की माझ्या प्रियतमेला तुम्ही सांगावा द्या. प्रिये तू कुठेस. तुझी वाट हा ययाति बघत आहे. कुसुमाग्रज ह्यांच सुंदर नाट्यगीत! ‘हे सुरानो चंद्र व्हा’ जितेंद्र अभिषेकी ह्यांनी अप्रतिम असं गायलं आहे.
अतुट शृंगार रसाने परिपूर्ण सुरेख अशी ही कादंबरी ययाति! जी रसिकांच्या हृदयात भिडून जाते. मी अत्यंत अल्प अस कादंबरीबद्दल लिहलं आहे कारण ही कादंबरी स्वतः वाचून जो अनुभव मिळतो तो नक्कीच सुंदर, अप्रतिम असा आहे. प्रत्येकाने एकदा तरी वाचावी अशी तीन व्यक्तीच्या मनोमिलनाची कथा म्हणजे ययाति कादंबरी. मला ही कादंबरी आवडली. अप्रतिम अशी ही कादंबरी जरुर वाचावी अशी आहे.
© स्वाती
हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्यांचे कोष माझ्या
प्रियकरला पोचवा।।
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या माणसाची
बरसुनी आकाश सारे
अमृतानें नाहवा!!
गीत : कुसुमाग्रज
स्वाती ठोंबरे,
लेख आवडला तर माझ्या नावाने शेअर करावा.