माझा मित्र म्हणतो..
सोनल , तु शिल्प आहेस
..प्रत्येकाला माहीत आहे शिल्प आखीव रेखीव असतं.. अनेक ठिकाणी शिल्प पाहीली की वाटतं, कलाकाराच्या हातात काय कला असेल ना..हीच कला आपल्या प्रत्येकाच्या हातात असते.. आपण स्वतः आपल्याला आखीव रेखीव बनवु शकतो.. काही गोष्टी जन्मताच आपल्याकडे आल्या आहेत पण काही ज्या फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतात..
व्यायाम ,आहार ,सकारात्मकता यावर प्रत्येक स्त्री शिल्प दिसु शकते..
फिल्ममधील काही मंडळी प्लास्टीक सर्जरी करत असतील पण मधे एका मित्राच्या फार्महाउसवर गेले तेव्हा असच एक चालतं बोलतं शिल्प मी पाहिलं आणि मला मोह आवरलाच नाही ती होती तिथल्या केअर टेकरची बायको..
काय ती स्कीन , काय फिगर आणि केस .. सगळे अवयव जिथल्या तिथे.. अप्रतिम सौंदर्य.. सावळी कांती ,त्यावर आलेली लाली .. कुठलाही मेकअप नाही.. साधी साडी नेसली होती.. तिचे उरोज पाहुन मी वेडी झाले तर पुरुषांचं काय होइल ना..
न राहवुन मी तिच्यापाशीं गेले आणि म्हटलं ,ताइ खुप सुंदर आहात हो .. त्यावर ती जी काय लाजली. हाय रे .. शब्द नाहीत माझ्याकडे.. त्यानंतर ती म्हणाली , तुम्ही पहिल्या असाल ज्यानी माझे कौतुक केले.. गावाकडे पोरं मागे फिरायची पण ती वासनेने पण खरं सौंदर्य तुम्ही ओळखलं.. तिने टोपली उचलली आणि गोठ्यात गेली.. मी तिच्यामागुन गेले आणि पाहत राहिले तर ती खाली वाकुन मस्त शेण भरत होती .. तेव्हा लक्षात आलं हे सौंदर्य इथे खुलतय.. शेतातल्या कामाने बहरतय.. इथल्या फ्रेश हवेने ती इतकी सुंदर आहे..आज गार्डन मधे वॉक ला गेले तेव्हा इतर स्त्रीयाचे निरीक्षण करते होते.. कोणी पिकनीकवर गप्पा तर कोणी काय खायला करावे यावर गप्पा मारतेय .. मग व्यायाम कोण करतय तर कोणीही नाही..
आपल्या शरीराचं शिल्प करायचं की भोपळा हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे..
अशी सुंदर शिल्प पाहिली की खऱ्या अर्थाने सुकुन मिळतो..
सोनल गोडबोले