नवीन टिपर घेण्यासाठी पैसे घेवुन ये म्हणुन महिलीस मारहाण व शिवीगाळ करून शारिरीक व माणसीक छळ
नांदेड जिल्हा क्राईम .. दि. ५ मे २०२३ ( जनसंपर्क अधिकारी ,पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड )
विवाहीतेचा छळ :-
1) शिवाजीनगर :- दिनांक 27.07.2020 रोजी चे 09.00 ते दि. 04.05.2023 रोजी चे 14.00 वा. चे दरम्यान, कारंजा लाड जि. वाशिम तसेच खराडी बायपास पुणे. तसेच फुलेगनगर नांदेड येथे, यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तुला स्वयंपाक येत नाही, तुला घरकाम करता येत नाही. लग्नामध्ये तुझ्या आई वडीलांनी आमचा मानपान केला नाही. तु आम्हाला पाच लाख रूपये दिल्याशिवाय व गृहउपयोगी वस्तु आणल्या शिवाय तुला घरात घेणार नाही असे म्हणून मारहाण व शिवीगाळ करून शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 32 वर्षीय महिला यानी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे शिवाजीनगर गुरनं 136 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 गादी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 81 बंडेवार, मो.क्र. 9923103778 हे करीत आहेत.
2) हदगांव :- दिनांक 07.03.2023 रोजी चे 11.00 ते दि. 14.03.2023 रोजी चे 15.30 वा. चे दरम्यान, फिर्यादी बाईचे सासरी बाजीराव शिवडी ता. लोहा जि. नांदेड येथे यातील नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तु आपले मिताचा व्यवसाय वाढविण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रूपये का आणत नाहीस म्हणुन मारहाण व शिवीगाळ करून उपाशी पोटी टेवुन शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 22 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हदगांव गुरनं 102 / 2023 कलम 498 (31), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2342 हंबर्डे, मो.क्रं. 9511229954 हे करीत आहेत.
3) लोहा :- दि. 05.06.2020 पासुन ते दि. 07.12.2022 रोजी चे दरम्यान, मौ. असर्जन तालुका जिल्हा नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तुझे माहेरहून नवीन टिपर घेण्यासाठी पैसे घेवुन ये असे म्हणुन फिर्यादीस मारहाण व शिवीगाळ करून शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 30 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरनं 107 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 2325 किरपणे, मो.क्रं. 9881708474 हे करीत आहेत.
2 ) अपघात :-
1) नांदेड ग्रामीण :- दि. 03.05.2023 रोजी चे 12.30 वा. चे सुमारास, लातुर फाटा धनेगाव उडानपुलाचे अलीकडे वाघोळेकर पेट्रोलपंपासमोर धनेगाव ता. जि. नांदेड येथे, यातील मयत नामे विष्णु आनंदा सुर्यवंशी, वय 22 वर्षे, रा. नरसी ता. नायगांव जि. नांदेड हा त्यांचा भाऊ मो सा क्र एमएच-26 / एपी-5044 वर बसुन नरसी ते नांदेड येथे परीक्षा कामी जाते वेळी लातूर फाटा धनेगाव उडानपुलाचे अलीकडे वाघाळेकर पेट्रोलपंपासमोर धनेगाव नांदेड येथे आले असता त्यांचे पाठीमागुन येणारी ट्रक क्रमांक एमएच-26 / एच-8334 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हयगय व निष्काळजीपणे चाहन चालवून मयताचे मोसा ला जोराची धडक देवुन लहान मुलगा विशाल यास गंभीर जखमी केले व यातील मयताचे मरणास कारणीभूत झाला आहे. वगैरे फिर्यादी आनंदा शंकर सुर्यवंशी, वय 45 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नरसी ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं. 312 / 2023 कलम 279, 338, 304 (अ) भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री नरवटे, मो.क्र. 8149863325 हे करीत आहेत.
3) जुगार :-
1) शिवाजीनगर :- दिनांक 04.05.2023 रोजी चे 20.20 वा. चे सुमारास, तेहरानगर बिल्डींगच्या बाजुला नांदेड येथे, यातील नमुद तीन आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी 1460 /- रुपयाचे मुद्देमालासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोउपनि / श्री मिलींद पि. मधुकरराव सोनकांबळे, ने पोस्टे शिवाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे पोस्टे शिवाजीनगर गुरनं 137 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 1053 मठदेवरू, मो.क्र. 9673545956 हे करीत आहेत.
2 ) इतवारा :- दिनांक 04.05.2023 रोजी चे 13.35 वा. चे सुमारास, तंबोली हॉटेलच्या जवळ सार्वजनिक रोडवर नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या टाईम बाजार नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 1240/- रुपयाचे मुद्देमालासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोना / 2543 हबीब जावर चाऊस ने पोस्टे इतवारा यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे पोस्टे इतवारा गुरनं 140 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 2306 चंचलवाड, मो.क्रं. 9730192361 हे करीत आहेत.
4) प्रोव्हिबीशन :-
1) मुक्रामाबाद :-
दिनांक 04.05.2023 रोजी चे 17.30 वा. चे सुमारास, मौ. सकनुर ता. मुखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या गावठी हातभट्टीची दारू व रसायण किंमती 42,200 /- रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोउपनि / श्री गजानन दत्ता काळे, ने पोस्टे मुक्कामाबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुक़ामाबाद गुरनं 121 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2319 सिध्देश्वर, मो.नं. 7620481485 हे करीत आहेत.
2)मरखेल :- दिनांक 04.05.2023 रोजी चे 18.00 वा. चे सुमारास, मौ. येडुर येथील पुलाजवळ ता. देगलुर जि. नांदेड येथे. यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या गावठी हातभट्टीची दारू किंमती 2000 /- रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोनि / श्री विष्णुकांत तुकाराम गुटटे, ने. पोस्टे मरखेल यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मरखेल गुरनं 102 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 94 शेख, मो.नं. 7776067774 हे करीत आहेत.
5) विद्युत शॉक लागून मृत्यु :-
मरखेल :-दिनांक 04.05.2023 रोजी चे 07.00 वा. चे सुमारास, गंगाबाई गोपाळ बडगे, यांचे शेतात लॉबत असलेल्या विदयुत तारेला मौ. खुतमापुर शिवार ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे सुरेश गोविंदराव बडगे, रा. खुतमापुर ता. देगलुर जि. नांदेड, हा त्याचे शेताचे शेजारील गंगाबाई बडगे यांचे शेतामध्ये लोंबकळत असलेल्या ताराचा शॉक लागुन मरण पावला आहे. वगैरे खबर देणार राहुल सुरेश बडगे, वय 26 वर्षे, व्यवसाय शेती रा. खतमापुर ता. देगलुर जि. नांदेड. यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे मरखेल आ. मृ. 04/2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोनि / श्री विष्णुकांत गुटटे, मो.नं. 8830564618 हे करीत आहेत.
जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड