ती आली , चित्त विचलीत झालं…
सकाळी ऱनींग ला गेले असताना ती ग्राउंडमधे घुसली आणि सगळे जण व्यायाम सोडुन तिच्याकडे पाहु लागले.. सुरुवात वाचताना तुमच्या समोर सुंदरी उभी राहीली असेल पण तीही सुंदरच होती.. गोरीपान , आखीवरेखीव, आल्या आल्या त्यांचा रोमांस सुरु झाला .. अगदी पहाण्यासारखं ते दृश्य होतं.. व्यायामाला आलेल्या लोकांनी तिच्याकडे काय ॲंगल ने पाहिले माहीत नाही पण मनातल्या मनात माझा लेख ग्राउंडवरच लिहुन झाला होता..
उत्सुकता वाढली ना… अहो , ती ५ सुंदर गाढवे होती..२ जोड्या आणि एक सिंगल.. मस्त बागडणं , मग फीमेल ला मनवणं आणि त्यानंतर तिला सेक्ससाठी उद्युक्त करणं सुरु असताना तिने अशी एकच लाथ मारली आणि तो बाजूला झाला कारण गाढव असुन त्याच्या लक्षात आलं होतं की तिला आता सेक्स नकोय , मग आपल्यासारख्या बुध्दीमान माणसाना का कळत नाही ??.. जे सिंगल गाढव होते त्याला काहीही देणं घेणं नव्हतं .. नंतर सगळे निमूटपणे चरायला लागले..
एक काकु म्हणाल्या , काय बाई सकाळी सकाळी पहायला लागतय .. त्यावर मी म्हटलं , काकु यालाच रोमांस म्हणतात .. जो आपण करत नाही.. काकुची सकाळी सकाळी विकेट गेली.. तु गाढव आहेस किवा गाढवासारखा वागु नकोस आपण किती सहज बोलुन जातो पण त्याच गाढवानी आज मला माणसात आणि त्यांच्यात असलेला फरक जाणवुन दिला.. त्यांनीच आजचा लेख माझ्याकडून लिहुन घेतला.. स्त्री जेव्हा सेक्ससाठी तयार असेल ( मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ) तेव्हाच त्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला पुढे जा.. त्यातले बारकावे समजुन घ्यायला मी लिहीलेली फॅंटसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स ही रसरशीत कादंबरी जरुर वाचा…
नक्की गाढव कोण आहे याचा विचार जरुर आपण करुयात..
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री