शीख धर्माचे दहावे गुरु संत गुरुगोविंदसिंगजी महाराज

नांदेड ; दत्तात्रय एमेकर
आज कांही कामा निमित्त नंदीग्राम नगरीत येण्याचा योग आला.नांदेड नगरी ज्यांच्या पदस्पर्शाने अजरामर झाली.त्यांचा जन्म माता गुजरी व पिता नववे गुरु सतगुरु तेग बहादुरजी यांच्या उदरी २२ डिसेंबर १६६६ रोजी झाला.
शीख धर्माचे देहधारी गुरु परंपरेतील दहावे गुरु गोबिंदसि॔ग महाराज यांनी आपल्या आधीच्या गुरुपरंपरेतील आधीचे म्हणजे पहिले गुरु नानक देवजी महाराज,सतगुरु अंगद देवजी महाराज,सतगुरु अमर दासजी महाराज,सतगुरु राम दासजी महाराज,सतगुरु अर्जन देवजी महाराज,सतगुरु हर गोबिंदजी महाराज, सतगुरु हरि रायजी महाराज, सतगुरु हरि कृष्णजी महाराज, सतगुरु तेग बहादुरजी महाराज यांच्या पूर्वी अन्यायविरुद्ध आवाज उठवत मानवता धर्म जपत आपल्या शीख धर्माची शिकवण अंगीकारुन जन सेवा हीच खरी इश सेवा करत आपल्या कार्याचा ठसा संपुर्ण विश्वावर उमटविला.एवढेच काय त्यांनी आपले चार सुपुत्र देखील अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढतांना शहीद झाले.त्यात सर्वात मोठे सुपुत्र साहबजादे बाबा अजितसिंगजी,साहबजादे बाबा जुझार सिंगजी,साहबजादे बाबा जोरावर सिंगजी आणि साहबजादे बाबा फत्तेह सिंगजी या चार पुत्रांना डोळ्यात देखत शहिद होतांना पाहिले.देहधारी परंपरेतील दहावे सतगुरु यांनी घोषित केले की यानंतर आमची गुरुपंपरा खंडीत करुन “गुरुग्रंथ साहेब”या ग्रंथराजास गुरु मानावे ही शिकवण आपल्या अनुयायांना दिली.याच पवित्र पावन तीर्थक्षेत्री दर्शन घेण्याचा योग आज महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन आणि कामगार दिनी
नंदीग्राम नगरीतील गुरु गोबिंदसि॔गजी महाराज यांचा गुरुव्दारा सचखंड हुजूर साहेब यांचे दर्शन घेतांना सचखंड हुजूर साहेब गुरुव्दारा प्रबंधक समितीचे माजी सदस्य सरदार रणजितसिंह चिरागीया यांच्या समर्थ हस्ते शिरापोव व संत कबीरजी यांचे दोहे, शिख धर्मातील शौर्य परंपरेच्या इतिहास अशी ग्रंथ संपदा देवून सत्कार प्रसंगी राजेंद्रसिंह पीआरओ उपस्थित होते.सत्कार केल्यानंतर वंदनीय गुरु गोविंदसि॔ग महाराज यांचे दर्शन घेऊन परिक्रमा करुन लंगरचा महाप्रसाद घेवून निघालो.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *