कंधार ; प्रतिनिधी
माझा महाराष्ट्र म्हणजे अस्सल कलावंताची खाणच आहे.हस्य कलावंत शाहीर दादा कोंडके यांनी अनेक चित्रपटातून माझ्या रसीक मायबापांचे निखळ मनोरंजन केले.त्यांची सलग नऊ चित्रपट गोल्डन जुबली झाले.ही परंपरा टेलिव्हीजन आणि मोबाईल येण्या आधीच निखळ मनोरंजन केले.त्यानंतर अनेक हस्य कलावंत या महाराष्ट्र भुमीवर आले.महाराष्ट्रातील लोककला अख्या विश्वात अजरामर आहे.आमच्या भागातील म्हणजे दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे खंडेरायाची भरते तेथेही अनेक नामांकित लोकनाट्य पथके येतात.तसेच बहाद्दरपूरा नगरीत शिवजयंती, म.बसवेश्वर जयंती श्री व्दादशभुजा देवी यात्रा महोत्सवात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार दिवंगत डाॅ.भाई केशवरा धोंडगे यांनी आणि माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे या दोन समाजवीरांना आपल्या अस्सल विनोदाने नेहमी गारुड घातले आहे. .
चड्वरील बाल वयात हास्य कलावंत ज्यांच्या सहज विनोदातून रसिक मायबापांना खदखदून हसण्यास भाग पाडणारे, आम्ही तर त्यांचा नाट्याभिनय पाहतांना जमीनीवर लोळण घेत हसून-हसुन पोट दुखे पर्यंत विनोद करणारा विनोदवीर कोंडिबा लाडेकर घोडजकर अस्सल गावरान मन्याड खोर्यातील मातीतला कलावंत यांनी लोकनाट्य मंडळात कोंडीबा लाडेकर या लाल कंधारी कलावंताची भेट.
फुलवळ येथील रहिवासी अन् श्री शिवाजी विद्यालय हाळदा ज्ञानालयातील आदर्श मुख्याध्यापक बाबुराव बसवंते यांचा मुलगा चि.सुशिल आणि कळका बोरी येथील वाघमारे परिवाराची चि.सौ.कां.अनिता यांचा विवाह कंधार शहरातील नगरेश्वर मंगल कार्यालयात आज ७ मे रोजी दुपारी पार पडला.या प्रसंगी म. बसवेश्वर महाराज छ.शाहू महाराज, छ.शिवाजी महाराज,
क्रांतिसूर्य म.ज्योतिराव फुले,वस्ताद लहूजी साळवे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या आदर्शांच्या प्रतिमेस मान्यवर पाहूणे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब,
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शिवा भाऊ कांबळे,अँड. प्रा.लक्ष्मीकांत लूंगारे, प्रा.डॉ. भगवानराव वाघमारे, केशवराव मेकाले विस्तार अधिकारी यांचे समर्थ हस्ते माल्यार्पण केले.त्यानंतर नियोजित वर-वधु यांच्या समर्थ हस्ते प्रतिमेस पुष्प पुजन करुन दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी ९ ऑगस्ट १९९० या क्रांतिदिनी महाराष्ट्र विधानसभेत वंदेमातरम या राष्ट्रीय गीत गात विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात झाली.म्हणून वंदेमातरम गीत गायल्यानंतर प्रत्यक्ष विवाहाला सुरुवात झाली.आज जागतिक हस्य दिन असल्यामुळेच मन्याड खोर्यातील हस्य कलावंत कोंडिबा लाडेकर यांचा सत्कार हुरहून्नरी कलावंत गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांच्या समर्थ हस्ते करुन जागतिक हस्यदिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बसवंते व वाघमारे परिवारातील सदस्य, वर पिता मुख्याध्यापक बाबुराव बसवंते, लेखनी बहाद्दर पत्रकार विश्वंभर बसवंते,किशोर वाघमारे,आदी पाहूणे मंडळी उपस्थित होते.
शब्दांकन ; दत्तात्रय एमेकर ,सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार