शेकापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत,शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचे 13 उमेदवार विजयी

 

कंधार ; प्रतिनिधी

शेकापुर तालुका कंधार येथे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचे तेरा पैकी तेरा उमेदवार निवडून आले असून एक हाती सत्ता आपल्या हाती घेतली आहे याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कंधार तालुक्याचे लक्ष लागलेल्या शेकापूर सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीमध्ये शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या शेकापूर, तळ्याचीवाडी, संगमवाडी, ढाकू नाईक तांडा, काशीराम तांडा, हिरामण तांडा , रामा तांडा,गणा तांडा, परिसरातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पुढारी मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले या साठी कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजीराव पाटील केंद्रे कंधार पंचायत समितीचे माजी सदस्य किसनराव डफडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, माजी सरपंच, शिवाजीराव केंद्रे, माजी सरपंच बाळासाहेब गर्जे, प्रभाकर केंद्रे ,विश्वनाथ गर्जे ,संगमवाडीचेे सरपंच ज्ञानोबा घुगे,यांनी प्रयत्न केले परंतु निवडणूक झाली या निवडणुकीत शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने मताने विजयी झाले, शेकापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणूक परिसरातील मतदाराने शेतकरी शेतमजूर विकास पॅनलच्या बाजूने एकतर्फी मतदान करून 13 संचालकांना निवडून दिले या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुक गाव पुढार्‍यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, परंतु मतदारांनी एकतर्फी मतदान करून गाव पुढाऱ्यांच्या बाजूनेच कौल दिला.
सर्वसाधारण गटातून
नामदेव निवृत्ती केंद्रे ,गोविंद भानुदास गर्जे, ज्ञानोबा हणमंत घुगे ,नामदेव सोमशिंग चव्हाण , सखाराम मोतीराम जाधव, किसन व्यंकटरावं डफडे,रामकिशन कांतीराम पवार ,अशोक सटवाजी मुसळे नामाप्र गटातून बाबू गंगाधर तांबोळे विमुक्त जाती गटातून, शिवाजी संभाजीराव केंद्रे , अनु जाती, गटातून, बालाजी कामाजी वाघमारे , महिला राखीव, कांताबाई ज्ञानोबा डफडे ,कमलबाई श्रीहरी मुंडे हे विजयी झाले
या निवडणुकीत शेकापूर चे सरपंच संजय भुस्कटे, उप सरपंच मोरेश्वर मोरे, ग्रा.प सदस्य, गणपतरावं गणपतराव केंद्रे श्याम केंद्रे केशव कदम सुधाकर वाघमारे धनराज पाटील डफडे माधव हरी वाघमारे विठ्ठल श्रीमंगले सुनील डफडे संगमवाडीचेे सरपंच ज्ञानोबा घुगे चक्रधर घुगे प्रभाकर केंद्रे परमेश्वर घुगे तळ्याचीवाडीचे सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ पाटील गर्जे, प्रभाकर केंद्रे,सोनबा मंगनाळे उपसरपंच खुशाल तांबोळे ग्रा.प. सदस्य राजीव केंद्रे , प्रदीप मगनाळे रंगनाथ जाधव गुलाब राठोड विनोद राठोड अंकुश पवार यांनी मुख्य भूमिका वटवली या विजयाबद्दल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर आमदार तुषार राठोड माजी सभापती संभाजी केंद्रे यांनी शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *