नव्याने तयार केलेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड करावी.. इंद्रधनू सृष्टी संवर्धन संस्थेची नितीन गडकरी यांच्या कडे मागणी..

फुलवळ(धोंडीबा बोरगावे )

नांदेड ते बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्त्याचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण होत आले असून कांही ठिकाणच्या पुलाचे काम प्रलंबित आहेत , याच महामार्गाचे काम सुरुवात करतेवेळी सदर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करत झपाट्याने वृक्षतोड केली गेली आणि या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले.

 

शासनाच्या वतीने या व अशा ज्या ज्या ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्यात आले असतील त्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पुन्हा नव्याने वृक्षारोपण करावेत असे आदेशीत करण्यात आले असतांनाही अद्यापही कुठेच वृक्ष लागवड करण्यात आली नसल्याचे खंत आजपर्यंत अनेक निसर्ग प्रेमींकडून व्यक्त करण्यात आली असली तरी नुकतेच ता. २० मे रोजी देशाचे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले असता इंद्रधनू सृष्टी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सदा वडजे व सचिव शिवाजीराव आंबूलगेकर यांनी लेखी निवेदन देऊन सदर रस्त्याच्या दुतर्फा लवकरात लवकर वृक्ष लागवड करावी अशी मागणी केली आहे.

 

गेली अडीच-तीन वर्षांपासून नांदेड ते बिदर या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून आजघडीला जवळपास ७० टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरीही आजही बहुतांश ठिकाणी पुलांची कामे प्रलंबितच आहेत तसेच बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण मुळे तर काही ठिकाणी त्या त्या गावकऱ्यांच्या अंतर्गत कलहात अरुंद झालेल्या रस्त्यांचे झालेले अर्धवट काम आजही अपूर्णच आहेत. ती अर्धवट कामे कधी पूर्ण होणार ? असा सवाल आजही सामान्य माणसाला सतावत असून अनेक ठिकाणी कॉर्नर , वाकण च्या रस्त्यामुळे छोटे मोठे अपघात होणे दैनंदिनीच ठरली आहे.

याच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरुवात करतांना सदर कामाच्या ठेकेदारांनी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या छोट्या मोठ्या वृक्षांची अमानुषपणे कत्तल केल्यागत झपाट्याने वृक्षतोड केली. त्यावेळी अनेक वृक्षप्रेमी व निसर्ग प्रेमींना याची मोठ्या प्रमाणावर खंत वाटत होती. परंतु तेंव्हा याच ठेकेदारांनी सांगितले होते की सदर रस्त्याचे काम जसजसे पूर्णत्वास येईल तसतसे या रस्त्याच्या दुतर्फा बाजुंनी नव्याने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसे शासनाच्या वतीने संबंधितांना आदेशीत ही केले असल्याचे सांगितले होते. शासन वृक्षारोपण व त्याचे संगोपन यावर अमाप खर्च करून ते वृक्ष टिकले आणि जगले पाहिजेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच असे निष्क्रिय ठेकेदार व संबंधित असलेले लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या आदेशाला सांबाबधितांकडून केराची टोपलीच दाखवली जात असल्याचे जण माणसांतून बोलले जात आहे.

यातच ता.२० मे रोजी माहूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले असता इंद्रधनू सृष्टी संवर्धन संस्थेच्या वतीने लेखी निवेदन देऊन नितीन गडकरी यांच्या माध्यमातून अखंड भारत देशात ठिकठिकाणी रस्त्यांच्या कामांचे जनुकाही जाळेच निर्माण झाले असून दळणवळण चा महत्वाचा घटक म्हणजे रस्ते हेच आहेत आणि आपण आपल्या कार्यकाळात याच रस्त्याच्या कामांना प्राधान्य दिले त्याबद्दल गडकरी साहेब आपल्या कार्याला व धैर्याला जण माणूस सलाम करतो आहे असे गौरउद्गार मांडून आता याच रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी पुन्हा नव्याने वृक्षारोपण करून निसर्गाचे संगोपन ही आपल्याच माध्यमातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत आपण आदेशीत करूनही संबंधित लोक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची खंत ही या संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *