नांदेड जिल्हा क्राईम
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्र. 209/2023
दिनांक : 27.05.2023
1) खुनाचा प्रयत्न :-
भोकर :- दिनांक 26.05.2023 रोजी 20.30 वा. चे सुमारास फिर्यादीच्या राहते घरा समोर भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील तिन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस व त्यांच्या मध्ये असलेल्या संडास बाथरूम बांधकामाच्या जुन्या वादाच्या कारणा वरून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याच्या उदेशने काठीने व कुराडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे. व खुन करण्याचा प्रयत्न केला. वगैरे फिर्यादी शिवा मारोती रामगिरवार वय 30 वर्षे व्यवसाय खजगी नोकरी एनडीसी बँक रा. कोळगल्ली ता.भोकर जि. नांदेड यांचे फिर्यादवरून पोस्टे भोकर गुरन 191 / 2023 कलम 307, 323, 504,34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री राम कराड, मो. नं. 9823714385 हे करीत आहेत.
2) घरफोडी :-
लोहा :- दिनांक 26.05.2023 रोजी थे 22.00 ते दि. 27.05.2023 चे 05.00 वा. थे दरम्यान, फिर्यादीचे घरी चिखलमोसी ता. कंधार नांदेड येथे यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या घराचे आतुन लावलेला कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करून लोखंडी कपाटाचे दार तोडुन सामान अस्तव्यस्त टाकुन कपाटाचे आतील लॉकर तोडन लॉकर मधील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा एकूण किंमती 1,04,000/- रूपयाचा माल चोरून नेला. वगैरे फिर्यादी शंकर देवराव रंडाळे, वय 48 वर्षे, व्यवसाय शेती रा. चिखलमोसी ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरन 127 / 2023 कलम 457, 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / सोनकांबळे, मो.क्र. 9823731311 हे करीत आहेत.
3) गंभीर दुखापत :-
मुदखेड :- दिनांक 26.05.2023 रोजी चे 16.00 वा. चे सुमारास, रेल्वेस्टेशन मजिद जवळील सार्वजनिक रोडवर मुदखेड जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व त्याचे मित्र मोटार सायकलने जात असताना रेल्वेस्टेशन मजिद जवळील सार्वजनिक रोडवर यातील आरोपीतांनी गैरकायदयची मंडळी जमवुन फिर्यादीस मोटार सायकलची कट का मारलास या कारणा वरून संगनमत करून शिवीगाळ करून फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्यानी मारहान केली व फिर्यादी व साक्षीदार निघुन जात असतांना त्यांचे वर दगड फेकुन दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी आविनाश साहेबराव मेटकर, वय 21 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. शिवाजीनगर मुदखेड जि. नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड गुरन 118 / 2023 कलम 326, 143, 147, 149, 324,427,506 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि / श्री अशोक अनंत्रे, मो. नं. 9518945033 हे करीत आहेत.
4) मोबाईल चोरी
नांदेड ग्रामीण :- दिनांक 27.05.2023 रोजी चे 02.00 ते 02.30 वा. चे दरम्यान, प्लॉट नं डी 48 ओमादातार ड्रिकींग वॉटर कंपनी एम आय डी सी नांदेड येथे, यातील फिर्यादीचे पाण्याच्या कंपनीमध्ये मजुर झोपलेले असतांना कोणी तरी अज्ञात चोरटयाने किंमती 32,000 /- रूपयाचा मोबाईल चोरून नेले. वगैरे फिर्यादी बालाजीसिंह ओमप्रकाशसिंह ठाकुर वय 42 वर्षे, व्यवसाय व्यापार रा.रवीनगर जुना कौठा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 373/2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2240 व्यवहारे मो.क्र. 9823827173 हे करीत आहेत.
5) विवाहीतेचा छळ :-
1) नांदेड ग्रामीण :- 27.07.2022 रोजी ते दिनांक 15.01.2023 रोजी पर्यंत फिर्यादीचे सासरी खडकपुरा नांदेड येथे, यातील
नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तु माहेरहून व्यवसाय टाकण्या साठी एक लाख रूपये व गाडी घेवुन ये म्हणुन शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेवुन शारिरीक व माणसीक छळ केला. व तु माहेरहून पैसे घेवुन आली नाहीस तर तुला खतम करून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 22 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 374 / 2023 कलम 498 (1), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 486 तेलंग, मो.क्र. 9307865842 हे करीत आहेत.
2) माळाकोळी :- 27.05.2023 पर्यंत फिर्यादीचे सासरी व मौजे फुलमाळातांडा ता.लोहा फिर्यादीचे माहेरी ह.मु.हरीचंद्रतांडा ता. लोहा जि. नांदेड येथे यातील नमुद सात आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तु माहेरहून कार घेण्यासाठी चार लाख रूपये घेवून ये म्हणुन शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेवून तुला कामधंदा काही येत नाही म्हणुन शारिरीक व माणसीक छळ केला व चारित्र्यावर संशय घेवुन घरातुन हाकलून दिले.तु कार घेण्यासाठी पैसे घेवुन अली नाहीस तर तुला खतम करतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली . वगैरे फिर्यादी 25 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे माळाकोळी गुरनं 64/2023 कलम 498(1), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2308 राठोड, मो.क्रं. 9284536640. हे करीत आहेत.
3) भाग्यनगर :- 20.08.2023 रोजी 14:00 से दिनांक 26.05.2023 रोजी 1330 दरम्यान फिर्यादीचे सासरी मौजे नेरली ता.
जि.नांदेड व काबरानगर नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस आरोपी के 01 से 03 यांनी तुझ्या आईने लग्नात काही एक सामान दिला नाही म्हणुन तु मला माझ्या आईच्या व वडिलाच्या उपचारा साठी 50,000 रुपये माहेरहून आणून मला दे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेवुन व आरोपी के 04 ही आरोपी के 01 यास नेहमी म्हणायची तु तिला सोडुल दे मी तुला दुसरी बायको करून देते, असे म्हणून शारिरीक व माणसीक छळ केला. व आरोपी के 05 तुला खतम करतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 21 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे भाग्यनगर गुरनं 109/2023 कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 भाववी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2150 माळवे, मो.क्र.9970379678 हे करीत आहेत.
4) कुंटुर :- दिनांक 23.05.2017 ते दिनांक 26.05.2023 पावेतो मौजे कुष्णुर फिर्यादीचे राहते घरी व सासरी कुष्णुर ता. नायगाव जि.नांदेड येथे, यातील नमुद 09 आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस उसाचे टोळी साठी माहेरहून 1.40,000/ रूपये घेवुन ये म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेवून पहिली पत्नी अतांना वर्षे गोपीचंद पवार हिचे सोबत दिनांक 21. 05.2023 रोजी दुसरे लग्न केले व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 21 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे कुंटुर गुरनं 01/2023 कलम 498 (अ) 494 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेका/1181 कुमरे, मो.क्र.9637706877 हे करीत आहेत.
6) प्रोव्हिबीशन :-
1) उस्माननगर :- दिनांक 27.05.2023 रोजी 18.00 वा. चे सुमारास, मौजे चिखली येथील अण्णाभाऊ साठे चौक जवळ प्लॉटमध्ये टिना पत्राचे रूम मध्ये ता. कंधार जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 9,800 /- रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ /566 रामेश्वर दिगंबर जायभाय,ने. पोस्टे उस्माननगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे उस्माननगर गुरनं 78 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 582 शिवपुजे, मो.नं.
8378989949 हे करीत आहेत..
2) धर्माबाद :- दिनांक 27.05.2023 रोजी 18.00 वा. चे सुमारास आरोपीचे राहते घरा समोर मोकळया जागेत शांतीनगर धर्माबाद ता.धर्माबाद जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या शिंदी किंमती 1600 /- रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोकों / संतोष रामेश्वर घोसले, ने. पोस्टे धर्माबाद यानी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे धार्माबाद गुरनं 116/2023 कलम 66 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोउपनि / कारामुगे, मो.नं. 9823184089 हे करीत आहेत.
3) उमरी :- दिनांक 27.05.2023 रोजी 19.10 वा. चे सुमारास आरोपीचे शेतामध्ये शेलगाव शिवार ता.उमरी जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 3360/- रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी नापोकों/सिदधार्थ शंकरराव केळकर ने पोस्टे धर्माबाद यानी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे धार्माबाद गुरनं 132/2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 938 बोडके, मो.नं. 9623658510 हे करीत आहेत.
4) मुदखेड :- दिनांक 27.05.2023 रोजी 18.00 वा. चे सुमारास आरोपीचे घराच्या शेजारी टिना पत्राचे ओपन शेडमध्ये दुर्गानगर मुदखेड जि.नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या सिंधी किंमती 2200/-रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / गंगाधर विठ्ठलराव कदम ने पोस्टे स्थागुशा नांदेड यानी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड गुरनं 119/2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 231 फोले, मो.नं. 9623658510 हे करीत आहेत.
जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड