नांदेड ; प्रतिनिधी
जादूगार प्रिन्स यांनी आपल्या अफाट जादुई कारनाम्याने केलेले एका पेक्षा एक आश्चर्यचकित प्रयोग पाहून अनाथ मुले, मूकबधिर, मतिमंद तसेच दिव्यांग विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांसह शेकडो रसिकांनी मनमुराद आनंद लुटल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वर्षभरातील ८३ व्या नवीन उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
भाजपा नांदेड महानगर,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने समाजातील उपेक्षित घटकाच्या मनोरंजनासाठी मोफत जादूचा शो कुसुम सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला. रोटरी अध्यक्ष मुरलीधर भूतडा यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. जुगल धुत, राजस्थानी महिला मंडळ नांदेडच्या अध्यक्षा शांता काबरा , एन्जॉय स्विमिंग स्विमिंग ग्रुप चे अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया, विश्वजीत मारुती कदम,अमित पाटील,भाजपा कामगार आघाडीचे सुरेश लोट व लायन्स अध्यक्ष अरुण काबरा, सुप्रिया ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपक्रम घेण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली.त्यानंतर जादूगार प्रिन्स यांनी कागद जाळून जादूने तयार केलेल्या आकर्षक पुष्पगुच्छापासून कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य करणारे शैलेश इनामदार,स्नेहलता जायसवाल,गोविंद जिगळे,डॉ.राजेंद्र मुंदडा,श्रीराम मेडेवार,अनिल धानोरकर,रवी पोतदार,ओंकार आडे,विलास माणिकवार, वसंत अहिरे, अभय शृंगारपुरे, व्यंकटेश कवटेकवार यांचा सत्कार करण्यात आला.जादूचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या सर्वांना रोटरी क्लब नांदेड तर्फे किशोर पावडे, ,प्रशांत गुर्जर,नागेश देशमुख यांनी पार्ले बिस्कीट वाटप केले. जादूगार प्रिन्स हे अवघ्या काही क्षणात आपला पेहराव बदलत असल्याचे पाहून सर्व जण थक्क झाले. आतापर्यंत न पाहिलेले जादूचे कारनामे मंत्रमुग्ध करणारे होते. प्रेक्षकातून बोलविलेल्या गौरी ठाकूर या मुलीला जादूगारांनी अधांतरी लटकून ठेवले. संपूर्ण सभागृहात खऱ्याखुऱ्या नोटांचा पाऊस पडला. आकर्षक स्टेजवर इच्छाधारी नागिन, भयानक गोरिला, एका मुलीच्या शरीराचे केलेले दोन तुकडे, रिकाम्या बॉक्समधून काढलेल्या दोनशे फूट तिरंगा ध्वज यासारखे असंख्य प्रयोग पाहून रसिकांनी टाळ्याचा कडकडाट केला. आपल्या शारीरिक व्याधीमुळे सदैव अडचणीत असलेल्या मुले व त्यांचे पालक यांना जादूचे अफलातून प्रयोग खूप आवडले.लहुजी साळवे अनाथाश्रम,मालपाणी मूकबधिर विद्यालय, मतिमंद विद्यालय, संध्या छाया वृद्धाश्रम, नेरली कुष्ठधाम या संस्थेतील गरजूसह नांदेड शहरातील अनेक दिव्यांग व त्यांच्या पालकांनी मनोरंजक शैलीत असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संघरत्न पवार, जनार्दन वाकोडीकर, अभिषेक एकबोटे, आनंद सोनटक्के,चंद्रभान सूर्यवंशी, गंगाधर सूर्यवंशी यांच्यासह सर्व माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शर्मा, कामाजी सरोदे, सविता काबरा, विजय वाडेकर, लालबाजी घाटे, विक्रम टर्के पाटील, संजय शिंदे, तुकाराम गायकवाड यांनी परिश्रम घेतले. शंभर ते चारशे रुपये तिकीट असलेल्या जादूच्या कार्यक्रमाचे समाजातील उपेक्षित घटकांसाठी मोफत आयोजन करून दिलीप ठाकूर यांनी आपला ८३ वा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.