कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील पेठवडज येथे अनेक दिवसापासून छुपा मार्गाने कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी केली जात होती परंतु यावर पाळत ठेवून पेठवडज येथील नागरिकांनी दिन चार रोजी पहाटे पाच वाजता कत्तलीसाठी जाणाऱ्या १५ गोवंशाचे वाहतूक करणाऱ्या दोन वाहनासह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले..
कंधार तालुका डोंगराळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशपालन केले जाते गोवंशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कंधार तालुक्यात आहे .शेती आखाड्यावर बांधलेल्या जनावरांची चोरी मोठ्या प्रमाणामध्ये करून ती जनावरे कत्तलीसाठी कत्तलखाने यामध्ये पाठवली जात असे प्रकार अनेक यापूर्वी घडले आहेत याची दखल घेऊन पेठवडज येथील नागरिकांनी जनावरांवर पाळत ठेवली व दि४ जून रोजी पहाटे ५ वाजता दोन टेम्पो वाहनांमध्ये गोरे साथ गाई ,एक वासरू , सात बैल गोरेअशी जनावरे भरून कतलीच्या उद्देशाने नेत असताना नागरिकांनी त्यांना अडवले विचारपूस केली असता उडवा उडवी ची उत्तरे देत असताना पोलीसाची संपर्क साधून ती वाहने व गोवंश पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तुकाराम जुने बक्कल नंबर ५२९ यांनी यांनी दिलेल्या पर्यादी वरून प्राण्यांची क्रूर पणे वाहतूक करणे अधिनियम १९६० कलाम (११क)(घ)(ड)(च) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ५(अ)५(ब) व मोटर वाहन कायदा कलम ६६/ १९२ नुसार नुसार १६३/२३ नुसार आरोपी जावेद इमामसाब कुरेशी , प्रकाश शांतआप्पा मठपती राहणार पेठवडज, शेषराव मारुती शेटेवाड राहणार बारूळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी आरोपीकडून १२ लाख ६३००० रुपये किमतीचे गाय, वासरू, बैल व टेम्पो क्रमांक M H २६ BE ६०७५,MH २७ BE ६३६५ मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राम पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी सी इंद्राळे, पो.हे.का धुळगंडे, तुकाराम जुने हे करीत आहेत