कंधार ; प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुजनवाडी तालुका कंधार येथे दि १५ जुन रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक संगम कदम व आदर्श शिक्षक जी जी शेख यांच्या नियोजनाखाली चिमुकल्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .
यावेळी गावकरी मंडळी तंटामुक्ती माजी अध्यक्ष विश्वनाथ कांबळे , अशोक चिवळे ,आनंद चिवळे , बाबाराव भालेराव आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती .
मुख्याध्यापक संगम कदम यांनी मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाल्याबद्दल गावकऱ्यांचा आणि सर्व पालकांचा खूप सहकार्य मिळाले आहे असे सांगत 2023 मधील सर्व विद्यार्थ्यांनाही शाळा चालू झाल्यामुळे स्वागत केले व पुस्तक वाटप केले असल्याची माहिती यावेळी दिली .