कंधार ; प्रतिनिधी
तहसिल कार्यालय कंधार मार्फत लाभ मंजुर असलेल्या 5780
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थीना ( 11254400/-) एक कोटी बारा लाख चौपन्न हजार चारशे रूपये एवढे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. ते लाभार्थीच्या खात्यावर जमाही झाले असल्याचे लाभार्थीकडून संदेश येत आहेत तसेच नांदेडचे पोस्ट पेमेंट बॅकेचे मॅनेजर प्रगत वानखेडे, स्टेट बॅकेकडूनही खात्यात अनुदान जमा केल्याचे शाखा मॅनेजर विलास रिनायत यांनी कळवीले आहे. तरी लाभार्थीनी आपले एप्रिल व मे 2023 असे एकुण दोन महीन्याचे अर्थसहाय्याचे अनुदान तपासून अधिकृत बॅक/पोस्ट कर्मचारी यांच्याकडूनच उचलावे,पावती घ्यावी असे आवाहन तहसिलदार कंधार राम बोरगांवकर यांनी केले .
संजय गांधी सर्व प्रवर्गाचे एकुण 2831 लाभार्थी व इंदीरागांधी व श्रावणबाळ योजनेच्या सर्व प्रवर्गाचे 2949 लाभार्थी असून इंडीयन पोस्ट पेमेंट बॅकेकडे-3809 लाभार्थीचे 7417400/-, स्टेट बॅक ऑफ इंडीया-1239 लाभार्थीचे 2415400/-, महाराष्ट्र ग्रामीण बॅक-602 लाभार्थीचे 1175400/-, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅक-80 लाभार्थीचे 158600/- तर आयडीबीय कुरुळा 44 लाभार्थीचे 87600/- असे एकुण 5780 लाभार्थीना 11254400/- एवढे अनुदान आज 15 जुन 2023 रोजी वितरीत करण्यात आले. जवळपास 1268 दिव्यांग,2300 च्या आसपास विधवा निराधार यामध्ये आहेत.
एप्रिल व मे असे दोन महीन्याचे अनुदान वितरीत व्हावे या करीता संगांयो शाखेचे प्रमुख नायब तहसिलदार अनिल मधुकर परळीकर,पेशकार माधव पवार, महसूल सहाय्यक बारकुजी मोरे, सुरेश वंजे,ऑपरेटर संगमेश्चर आदींना परीश्रम घेतल्याचे तहसिलदार कंधार राम बोरगांवकर यांनी सांगीतले.
मा. प्र.जिल्हाधिकारी नांदेड पि.एस.बोरगांवकर , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक संगांयो शाखेचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार श्रीमती ज्योती चौहाण यांनी अनुदान उपलब्ध करुन दिल्याबद्दल,पोस्ट व स्टेट व इतर बॅकेने तात्काळ लाभार्थीच्या खात्यावर अनुदान जमा केल्याबद्दल व या कामी प्रभारी उपकोषागार अधिकारी कंधार मुंडे यांनी तात्काळ देयके मंजुर करुन सहकार्य केले त्याबद्दल संजय गांधी निराधार विभाग- विशेष सहाय्य विभाग तहसिल कार्यालय कंधार कडून आभार व्यक्त केले आहेत.
सर्व लाभार्थीना व कंधार तालुक्यातील नागरीकांना आषाढी व यामहीन्यातील विविध सण उत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा तहसिल कार्यालयाकडुन दिल्या आहेत
16 जुन 2023 रोजी उस्माननगर येथे आयोजित शासन आपल्या दारी अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात लाभार्थीना आपली पेंशन आपल्या दारी अभियानांतर्गत पोस्ट पेमेंट बॅंकेचे कर्मचारी अनुदान वितरित करतील तरी उस्माननगर व नजीकच्या गावातील लाभार्थीना याचा लाभ घ्यावा व ज्यांनी अद्याप पोस्ट पेमेंट बॅंकेचे खाते क्रमांक तहसील कार्यालयात जमा केलेले नाही त्यांनी या कार्यक्रमाचे ठिकाणी जमा करावेत, पोस्ट पेमेंट बॅंकेचे कर्मचारी या कामी तहसिल कार्यालयास सहकार्य करणार आहेत याची नोंद लाभार्थींनी घ्यावी असेही आवाहन तहसिलदार कंधार राम बोरगांवकर यांनी केले आहे .